Press "Enter" to skip to content

बिहार मध्ये ‘गो बॅक मोदी’चे नारे आणि रस्त्यांवर ग्राफिक्स? वाचा सत्य!

बिहार निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी तेजीत आहे. अशात सोशल मीडियातून एक फोटो दणदणीत व्हायरल होतोय ज्यामध्ये रस्त्यांवर ‘Go Back Modi’ असे लिहिल्याचे दिसून येतेय.

‘बिहार इज ऑन फायर मोड’ या कॅप्शनसह विविध मोदी विरोधक ग्रुप्समध्ये, वैयक्तिक सोशल मिडिया अकाउंट्सवर हा फोटो शेअर केला जातोय. ‘काश्मीर युथ पॉवर’ या फेसबुक पेजवरून ‘एक बिहारी सौ पर भारी’ या कॅप्शन सह शेअर झालेल्या पोस्टला बातमी करेपर्यंत ३ हजार लाईक्स, ११६ कमेंट्स आणि ८०९ शेअर्स होते.

Advertisement
Go back modi bihar fb viral post checkpost marathi
Source: Facebook

अर्काईव्ह लिंक

हा फोटो बिहारच्या नावाने किती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हे जाणून घेण्यासाठी फेसबुकवर ‘Bihar on Fire’ असे सर्च करून पाहिल्यास आपल्यासमोर अनेक पोस्ट्स येतील.

Go back modi bihar fb viral posts checkpost marathi
Source: Facebook

ट्विटर सुद्धा यास अपवाद नाही.

पडताळणी:

व्हायरल इमेजला रिव्हर्स सर्च करून आणि ऍडव्हान्स किवर्ड्सच्या आधारे सर्च करून पाहिले असता ही इमेज ताजी नसून जवळपास ९ महिन्यापूर्वीची असल्याचे समोर आले.

टाईम्स नाऊ, एबीपी आनंदा यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलेल्या मयूर रंजन घोष यांनी ११ जानेवारी २०२० रोजी सदर फोटो ट्विट केला होता. ‘हा कलकत्ता शहरातील एक वर्दळीचा रस्ता असून इथे नेहमी ट्राफिक पहायला मिळत असते पण आज ट्राफिक नव्हे तर ग्राफिक आहे’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते.

याच ट्विटमधील माहितीनुसार सर्च केले असता आम्हाला टाईम्स ग्रुपच्या ‘ईसमय‘ या बंगाली वृत्तपत्राची १२ जानेवारीची आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ची १३ जानेवारीची बातमी मिळाली. या बातम्यांनुसार कलकत्त्यातील ‘Esplanade‘ मेट्रो स्टेशनजवळील रस्त्यांवर हे ग्राफिक्स ‘नागरी सुरक्षा विधेयक’ म्हणजेच ‘CAA’विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा भाग होता.

वस्तुस्थिती:

व्हायरल पोस्टमधील फोटोमध्ये ‘Go Back Modi’ लिहिलेले ग्राफिक्स खरे असले तरी ते बिहार मधील नसून कलकत्त्यात जानेवारी महिन्यात झालेल्या CAA विरुद्धच्या आंदोलनातील आहे.

हेही वाचा: बिहार भाजपच्या मंत्र्याने प्रचारासाठी वापरला हैदराबादच्या उड्डाणपुलाचा फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा