केरळात गरोदर हत्तीणीचा मृत्यू झाला. मुस्लीमद्वेष्ट्यांनी घटना मुस्लीमबहुल ‘मलप्पुरम’ जिल्ह्यात घडल्याचं म्हणत रान पेटवलं. त्याचं आम्ही फॅक्टचेक करून खोटं पाडलं. तर लोकांनी त्या प्रकरणात आरोपी पकडले आणि त्यांची नावे अमजद अली आणि तमीम शेख असल्याचं म्हणत मुस्लीम धर्मावर पुन्हा निशाणा साधला.
‘केरल में गर्भवती हथिनी की हत्या के मामले में दो लोगों को गिरफ्तार किया गया है. हत्या के मामले में अमजद अली और तमीम शेख की गिरफ्तारी हुई है. इन आरोपियों पर कडी कारवाई होनी चाहिये.’
असं ट्विट पत्रकार दीपक चौरसिया यांनी केलं. ते वायरल झालं. तब्बल २,४९७ लोकांनी रीट्विट केलं. अनेकांनी स्क्रीनशॉट काढून शेअर केलं.
नंतर खरी माहिती कळल्यावर चौरसिया यांनी ते ट्विट डिलीट केलं पण तोवर ते बऱ्याच दूरवर पोहचलं होतं.
‘सुदर्शन न्यूज’, ‘लाइव्ह हिंदुस्थान’ यांनी देखील हेच केलं. अमजद अली तमीम शेख यांच्या नावाने बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या व्हायरल झाल्या आणि मग डिलीट करून टाकल्या.
हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अमजद अली, तमीम शेख यांच्या नावे ट्विटरवर पोस्टचा पूरच जणू आला.
पडताळणी:
‘सुदर्शन न्यूज’, ‘लाइव्ह हिंदुस्थान’कडे या बातम्या पोहचल्या म्हणजे इतरही मीडियामध्ये या बातम्या असायला हव्या होत्या. कारण हत्तीण प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पण तसं झालं नाही, इतर ठिकाणी कुठे ही नावं किंवा अशा बातम्या सापडल्या नाहीत. तिथेच आम्हाला शंका आली.
‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणीला सुरुवात केली तेव्हा आम्हाला ‘डीडी न्यूज मल्याळम’चे ट्विट्स सापडले.
दूरदर्शन:
केरळातील हत्तीणीच्या खुनाच्या तपासात मोठी गोष्ट गवसलीय. ‘विल्सन’ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलं आहे. दोन संशयितांची चौकशी चालू आहे.
पुरावे गोळा करण्यासाठी आरोपी शे.विल्सन यांना वृक्षारोपण परिसरात नेले जात आहे. तो तेथील वृक्षारोपणात एक टॅपिंग मजूर आणि पर्यवेक्षक म्हणून काम करत होता.
‘द न्यूज मिनिट’ने सुद्धा आपल्या बातमीत हेच सांगितलंय की ‘पलक्कडचे पोलीस अधीक्षक जी. सिवा विक्रम यांनी बातमीला दुजोरा दिलाय. त्यांनी सांगितलंय की आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव पी. विल्सन आहे. तो पलक्कड मध्येच रबर टॅपिंगचं काम करतो. गुरुवारी ज्या तीन जणांना ताब्यात घेतलंय त्यापैकी हा एक आहे. थिरूवळमकुन्नू फॉरेस्ट स्टेशनचे डेप्युटी रेंज ऑफिसर एम. ससीकुमार यांनीही या बातमीस दुजोरा दिला.’
‘द न्यूज मिनिट’ने बातमीत असंही लिहिलंय की वन विभागाने तीन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण विल्सनला ठेऊन इतर दोघांना सोडून देण्यात आलं. त्या रबर प्लांटेशनचे मालक असलेले करीम आणि रियाझ दोघे फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलीय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये दूरदर्शन मल्याळम, द न्यूज मिनिट यांनी दिलेल्या बातम्यांतून हीच वस्तुस्थिती समोर आली आहे की, केरळातील हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एक अटक झालीय. आरोपीचे नाव विल्सन आहे.
प्लांटेशनचे मालक फरार आहेत, त्यांची नावं करीम आणि रियाझ अशी आहेत.
या संपूर्ण पडताळणीमध्ये अमजद अली, तमीम शेख अशी कुठलीच नावं सापडली नाहीत.
दीपक चौरसिया, सुदर्शन न्यूज, हिंदुस्थान लाइव्ह यांना आपल्या बातम्या ट्विट्स डिलीट करावे लागले यातच सगळं काही आलं. एकुणात काय तर केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अटक झाली; पण अमजद अली, तमीम शेख यांना नाही!
हे ही वाचा
[…] हेही वाचा: केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अट… […]
[…] हेही वाचा: केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अट… […]
[…] हे ही वाचा- केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अट… […]