Press "Enter" to skip to content

व्हायरल फोटोत नरेंद्र मोदींसोबत दिसणारी व्यक्ती अण्णा हजारे आहेत का?

सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर हात टाकून उभी असलेली एक व्यक्ती दिसतेय. दावा केला जातोय की नरेंद्र मोदींच्या खांद्यावर हात टाकलेली व्यक्ती अण्णा हजारे (narendra modi with anna hazare) असून त्यांचे नरेंद्र मोदींशी अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत.

Advertisement

फोटोच्या वरच्या बाजूला ”फोटो बहुत पुराना है मगर याराना साफ दिख रहा है मूर्खों अब पूछना नहीं –“अन्ना चुप क्यूं है?” असं लिहिलेलं बघायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळेच अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी मौन धारण केलेलं असून ते सरकारच्या विरोधात बोलत नसल्याचा दावा केला जातोय.

या वर्षाच्या सुरुवातीला देखील फेसबुकवर हा फोटो काहीश्या अशाच दाव्यांसह व्हायरल झाला होता. फेसबुक युजर नंदिनी जाधव यांनी “RSS च्या शिबीरातील दोन दलाल – भामट्यांचा एकत्रीतपणे काढलेला दुर्मिळ फोटोग्राफ्स. माणसाचे चरीत्र आणि चारित्र्य समजायला पुरेसा आहे” या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला होता. त्यांची पोस्ट ३५३ युजर्सकडून शेअर करण्यात आली होती.

RSS च्या शिबीरातील दोन दलाल – भामट्यांचा एकत्रीतपणे काढलेला दुर्मिळ फोटोग्राफ्स.माणसाचे चरीत्र आणि चारित्र्य समजायला पुरेसा आहे.

Posted by Nandini Jadhav on Saturday, 26 December 2020

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिसणारी व्यक्ती खरंच आण्णा हजारे (narendra modi with anna hazare) आहेत का? आणि तसे ते नसतील तर ही व्यक्ती नेमकी कोण हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.

आम्हाला ‘इंडिया टुडे’च्या वेबसाईटवर १९ मे २०१४ रोजी प्रसिद्ध लेख मिळाला. या लेखात सध्या व्हायरल होत असलेला फोटो वापरण्यात आला आहे. ‘द मॅन बिहाइंड मोदी: लक्ष्मणराव इनामदार’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध लेखानुसार फोटोत नरेंद्र मोदी यांच्यासह दिसणारी व्यक्ती लक्ष्मणराव इनामदार (Lakshman rao Inamdar) आहेत.

India today news showing Modi with laxmanrao Inamdar
Source: India Today

लक्ष्मणराव इनामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नरेंद्र मोदींवर इनामदार यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. मोदींनी इनामदार यांच्या जीवनावर ‘वकीलसाहेब लक्ष्मणराव इनामदार’ नावाचे पुस्तक देखील लिहिलेले आहे. इनामदार हे मोदींच्या गुरुस्थानी होते. त्यांचं १९८४ सालीच निधन झालेलं आहे.

‘झी २४ तास’च्या वेबसाईटवर २१ मे २०१४ रोजी `मी आणि मोदी लक्ष्मणरावांच्या तालमीतले पहेलवान` या मथळ्याखाली प्रकशित बातमीत देखील हाच फोटो वापरण्यात आल्याचे आढळून आले. या बातमीत गुजरात विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना आपण आणि नरेंद्र मोदी लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत तयार झाल्याची आठवण सांगितली होती.

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इनामदार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता. “माझं सौभाग्य होतं की माझ्या तारुण्यातील अनेक वर्षे त्यांच्या सहवासात घालवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. माझ्यासाठी वकीलसाहेबांचं जीवन नित्य प्रेरणेचा स्रोत राहिलेलं आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचा आण्णा हजारे यांच्या सोबतचा म्हणून शेअर केल्या जाणारा फोटो दिशाभूल करणारा आहे.

फोटोत नरेंद्र मोदींसह दिसणारी व्यक्ती आण्णा हजारे नसून मोदींच्या मार्गदर्शकांपैकी एक राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते लक्ष्मणराव इनामदार आहेत. इनामदार यांचं १९८४ सालीच निधन झालेलं आहे.

हे ही वाचा- नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा