Press "Enter" to skip to content

‘मनमोहन सिंह नव्हे सोनिया गांधीच पंतप्रधान होत्या’ सांगत व्हायरल होतोय दिशाभूल करणारा व्हिडीओ!

सोशल मीडियावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (manmohan singh) आणि सोनिया गांधी (sonia gandhi) यांचा जूना व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडीओच्या माध्यमातून कॉंग्रेस काळात पंतप्रधानपदावर डॉ. मनमोहन सिंह केवळ नामधारी होते, खऱ्या पंतप्रधान सोनिया गांधी होत्या असे दावे व्हायरल होतायेत.

अर्काइव्ह पोस्ट

‘जो लोग आज भी ये समझते हैं किमनमोहन सिंह 10 साल तक प्रधानमंत्री थेवो 20 सेकंड के इस वीडियो को 4 बारज़रूर देखें….!!!’

Advertisement
या कॅप्शनसह ‘भाजप सोशल मिडिया सेल बीड जिल्हा’, हिंदू हुं घमंड तो होगा, राष्ट्रभक्त अशा नावांच्या फेसबुक ग्रुप्स वरूनदेखील सदर व्हिडीओ शेअर झाला आहे.

जो लोग आज भी ये समझते हैं किमनमोहन सिंह 10 साल तक प्रधानमंत्री थेवो 20 सेकंड के इस वीडियो को 4 बारज़रूर देखें….!!! 👇

Posted by भाजपा सोशलमिडियासेल बीड जिल्हा on Monday, 24 May 2021

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. जितेंद्र नागर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात ते म्हणताहेत की बघा कशा प्रकारे ती (सोनिया गांधी) तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दुर्लक्षित करतेय.

अर्काईव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे आणि प्रवीण साखरे यांनी सदर व्हायरल व्हिडीओ आणि त्यासोबतचा मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हिडीओच्या पडताळणी दरम्यान आम्हाला असे लक्षात आले की हाच व्हिडीओ २०१८-१९ मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यावेळी दावा करण्यात आला होता की मनमोहन सिंह (manmohan singh) तर नावाला पंतप्रधान होते. देशाची सूत्रे सोनिया गांधींच्याच (sonia gandhi) हाती होती.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी २०१८ मध्ये आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आज देखील त्यांच्या ट्विटर टाईमलाईनवर उपलब्ध आहे.

अर्काइव्ह पोस्ट

आम्ही काही किवर्डसच्या मदतीने युट्यूबवर हा व्हिडीओ शोधला असता एनएनआयएसच्या युट्यूब चॅनेलवरून 26 एप्रिल 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय की श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेतली.

चार दिवसांच्या या दिल्ली दौऱ्यात रनिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह आणि तत्कालीन विदेश मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांची देखील भेट घेतली आणि भारत-श्रीलंकेदरम्यानच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केल्याचे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थितरीत्या बघितला असता सोनिया गांधी अगदी अदबीने मनमोहन सिंह यांचे स्वागत करत असल्याचे बघायला मिळतेय.

रनिल विक्रमसिंघे यांच्या या भेटीची बातमी ANI या वृत्तसंस्थेने देखील दिली होती. बातमीच्या ट्विटनुसार हा प्रसंग २६ एप्रिल २०१७ रोजीचा आहे. अर्थातच त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधानपदी नव्हते. देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. त्यामुळेच बातमीच्या ट्विटमध्ये डॉ. सिंह यांचा उल्लेख ‘माजी पंतप्रधान’ असा करण्यात आला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडीओ मनमोहन सिंह पंतप्रधान असतानाच्या काळातील नसून २०१६ सालातील आहे.

शिवाय सोनिया गांधी मनमोहन सिंह यांचा अनादर किंवा अपमान करत असल्याचे दावे देखील निराधार आहेत. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघितल्यास सोनिया गांधींकडून मनमोहन सिंहांचे यथोचित स्वागत करण्यात आल्याचे बघायला मिळेल.

हे ही वाचा-  सोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात आले?

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

  1. Joey Joey May 25, 2021

    good

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा