Press "Enter" to skip to content

घाबरू नका! १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवांत तथ्य नाही!

मार्च महिन्यात १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद (ban on 100 10 and 5 rupees note) करण्याचा विचार RBI करत असल्याच्या बातम्या अनेक खाजगी पोर्टल्सने दिल्या आहेत.

Advertisement

‘पुराने 100, 10 और 5 रुपये के नोट हो सकते हैं बंद, RBI कर रहा है विचार’ या हेडलाईनसह ‘चौपाल टीव्ही’ या वेब पोर्टलने बातमी प्रसिद्ध केलीय आणि आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केलीय.

Chuapal TV news regarding note ban of 100 and 10
Source: Facebook

‘ठोस प्रहार’ नावाच्या पोर्टलने सुद्धा अशीच ‘आताची मोठी बातमी…मार्च पासून ह्या जुन्या नोटा होतील चलनातून बाद’ या हेडलाईन सह बातमी प्रसिद्ध केलीय.

Source: Thos Prahar

सदर बातमीची लिंक व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक धर्मराज देवकर यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

मागच्या ५००-१००० रुपयांच्या नोटबंदीनंतर देशात जी काही खळबळ माजली होती तशीच यावेळी अवस्था होऊ नये, लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्यतेची पडताळणी करणे गरजेचे होते. यासाठी आम्ही व्हायरल दाव्यांमधील कीवर्ड्सचा आधार घेत गुगल सर्च केले.

यातून आम्हाला PIB या अधिकृत शासकीय माहिती आणि प्रसारण संस्थेच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आलेली माहिती सापडली.

या ट्विटमधील माहिती नुसार ‘१००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे (ban on 100 10 and 5 rupees note) सांगणाऱ्या बातम्या फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. RBI ने असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केलेय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ‘मार्च महिन्यात १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा’ बंद होण्याचे दावे करणाऱ्या बातम्या निराधार आणि फेक असल्याचे स्पष्ट झाले. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अशी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. या खोडसाळपणाच्या बातम्यांवर विशास ठेऊन घाबरून जाऊ नये.

हेही वाचा: ATM मशीनमधून 2 हजार रूपयांची नोट निघणार नसल्याच्या दाव्यात किती तथ्य?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा