Press "Enter" to skip to content

रवीश कुमार यांनी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही, व्हायरल दावे चुकीचे!

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या अपघाती मृत्यूनंतर अवघा देश शोकाकुल असताना पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.

Advertisement

रवीश कुमार भारतीय सेनेवर संशय घेत असल्याचा दावा करतानाच त्यांना देशद्रोही आणि गद्दार देखील संबोधलं जातंय. अनेकांकडून त्यांना शिवीगाळ केली जातेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

रवीश कुमार यांनी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या विषयी कुठलेही वादग्रस्त वक्तव्य दिले असल्याचे किंवा भारतीय सेनेवर संशय व्यक्त केल्याची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.

जनरल रावत यांच्या अपघाताविषयीच्या पोस्टमध्ये रवीश कुमार यांनी ही अतिशय दुःखद घटना असल्याचे सांगत अपघातात जिवंत वाचलेले ग्रुप कैप्टन वरुण सिंह (Varun Singh) लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताच्या दिवशी रवीश यांनी केलेल्या प्राईम टाईम शो मध्ये देखील त्यांनी कुठेही कसलेही वादग्रस्त वक्तव्य दिलेले नाही. संपूर्ण शो आपण एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर बघू शकता.

शिवाय रवीश कुमार यांनी स्वतःच १० डिसेंबर रोजीच्या प्राईम टाईम शो मध्ये सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांचे खंडन करत हे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या प्राईम टाईम शो मध्ये रवीश कुमार सांगतात,  

“आपण जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याविषयी अशा प्रकारची कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ना कुठे लिहिलं आहे, ना आपल्या कुठल्या कार्यक्रम असं काही वक्तव्य दिलं आहे.”

आपण रवीश कुमार यांचा प्राईम टाईम शो बघू शकता.

वरील बातम्या युट्युब नियमांनुसार 18 वर्षांच्या वरील वयोगटातील वापरकर्त्यांनाच पहावयास उपलब्ध असल्याने ते व्हिडीओज या वेबसाईट वर पाहता येणार नाहीत. व्हिडिओजवर लिहिलेल्या ‘watch on YouTube’ वर क्लिक केल्यास आपण ते पाहू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की एनडीटीव्हीचे पत्रकार रवीश कुमार यांनी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीविषयी कुठलेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. सोशल मीडियावरील व्हायरल दावे संपूर्णतः चुकीचे आहेत.

हेही वाचा- खरंच NDTV चे मालक प्रणॉय रॉय पाकिस्तानी आहेत का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा