Press "Enter" to skip to content

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींची जाहीर स्तुती केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एडिटेड!

‘भारताला गेल्या ७३ वर्षात कधीच अशा पोलादी इच्छाशक्तीचं नेतृत्व लाभलं नव्हतं’ अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याचा (imran khan praises modi) दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

‘नरेंद्र मोदींसाठी याहून मोठी प्रकट मान्यता काय असेल जिथे स्वतः शत्रू जाहीरपणे हे मान्य करत आहे की भारताला गेल्या ७३ वर्षात कधीच अशा पोलादी इच्छाशक्तीचं नेतृत्व लाभलं नव्हतं!’ या अर्थाच्या इंग्रजी कॅप्शनसह लेखिका शेफाली वैद्य यांनी फेसबुक आणि ट्विटरवर सदर व्हिडीओ शेअर केला आहे.

Advertisement

अर्काईव्ह लिंक

वैद्य यांचीच पोस्ट कॉपीपेस्ट करत एका फेसबुक युजरने इमरान खान नरेंद्र मोदींची स्तुती करत असल्याचा (imran khan praises modi) दावा केलाय.

You cannot have a more ringing endorsement of @narendramodi govt than this. Your sworn enemy publicly admitting that in 73 years India had never had a government as strong and iron-willed as this!

Posted by Jayaram Choudhary Velagapudi on Sunday, 10 January 2021

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची बारकाईने तपासणी केली असता तो अचानकच अर्धवटपणे संपल्याचे लक्षात आले. त्यामुळे मूळ व्हिडिओ शोधण्यासाठी आम्ही किफ्रेम्सच्या मदतीने रिव्हर्स ईमेज सर्च केले.

यातून आम्हाला ’92 News HD Plus’ या वाहिनीच्या फेसबुक पेजवर २६ डिसेंबर २०२० रोजी अपलोड करण्यात आलेला ११ मिनिटांचा मूळ व्हिडीओ सापडला. परंतु यातही व्हायरल व्हिडीओ प्रमाणेच अर्धवट माहिती असल्याचे लक्षात आले.

92 News Headlines | 06:00 PM | 26-12-2020

92 News Headlines 06:00 PM26-12-2020#92NewsHDPlus #News #Headlines #Pakistan

Posted by 92 News HD Plus on Saturday, 26 December 2020
Source: Facebook

या व्हिडिओचा आधार घेऊन आम्ही मूळ वक्तव्य शोधण्याचा प्रयत्न केला असता युट्युबवर त्याच दिवशी म्हणजे २६ डिसेंबर २०२० रोजी एक व्हिडीओ वाहिनेने अपलोड केलेला आहे.

‘I will Not let opposition Target our Army’ या शीर्षकाखाली अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओत ५.५५ मिनिटाच्या पुढे आपणास व्हायरल दाव्यासंबंधी माहिती सापडेल.

Source: Youtube

इम्रान खान यांचे नेमके वक्तव्य:

“पाकिस्तान को एक मज़बूत फ़ौज की ज़रूरत है तो आज ज़रूरत है | और क्यों ज़रूरत है, क्यूंकि हमारे साथ जो हमारा हमसाया है, तिहत्तर साल में इस तरह की हुकूमत नहीं आयी जो आज हिंदुस्तान में है | जो कि एक इन्तेहापसन्द, एक टोटलिटेरियन, एक रेसिस्ट, एंटी मुस्लमान और एंटी इस्लाम, एंटी पाकिस्तान …कभी ऐसी हुकूमत नहीं आयी ..और जो उन्होंने कश्मीरियों से कर रहे हैं”

हे संपूर्ण वक्तव्य वाचल्यास लक्षात येईल की इम्रान खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत नसून ७३ वर्षातील सर्वात एककल्ली आणि टोकाचे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाच करताहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींची जाहीर स्तुती केल्याचे दावे खोटे आहेत. ज्या व्हिडीओचा आधार घेऊन हे दावे होतायेत तो अर्धवट आहे. मूळ वक्तव्यात इम्रान खान मोदींची स्तुती करत नसून टीका करत आहेत.

हेही वाचा: खरंच पाकिस्तानातल्या कराचीमध्ये ‘तिरंगा’ फडकविण्यात आला?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा