Press "Enter" to skip to content

‘हिंदू मुस्लीम एकते’ची साक्ष देणारी कौतुकास्पद घटना खरीच, पण पुण्याची नाही! मग कुठली?

सोशल मीडियावर एका अंत्ययात्रेचा फोटो शेअर करण्यात येतोय. पुण्यामध्ये रमाकांत जोशी या एमबीबीएस डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू (dr. ramakant joshi corona) झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत तब्लिगी जमातचे काम करणाऱ्या तरुणांनी त्यांचा अंत्यविधी केल्याचा दावा फोटोसोबत केला जातोय.

‘सकल मुस्लीम युवक महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवरून पोस्ट केलेली ही पोस्ट बातमी करेपर्यंत ६९६ जणांनी शेअर केली होती.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=192807538888668&id=100044782704175

अर्काईव्ह पोस्ट

ट्विटर आणि व्हाट्सएपवर देखील हाच फोटो याच दाव्यासह पोस्ट करण्यात येतोय.

अर्काइव्ह पोस्ट

या व्हायरल दाव्याला व्हॉट्सऍप वर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जात असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिग्विजय डुबल यांनी निदर्शनास आणून दिले.

Source: Whatsapp

पडताळणी:

डॉ. रमाकांत जोशी यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या (dr. ramakant joshi corona) कुठल्याही घटनेची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये नसल्याने घटना नेमकी कुठली हे शोधण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.

आम्हाला हा फोटो ट्विटरवर मिळाला. ट्विटर यूज़र एम.डी. असिफ खान यांनी २८ एप्रिल २०२० रोजी ट्विटर अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केलाय.

फोटो मेरठमधील असून ६५ वर्षीय रमेश चंद्र माथूर यांचं आजारपणामुळे निधन झाल्यानंतर मुस्लिम समाजाने त्यांचे अंत्यविधी पार पाडले, अशी माहिती त्यांनी कॅप्शनमध्ये दिलीये.

या माहितीची खात्री पटविण्यासाठी आम्ही ‘रमेश चंद्र माथूर, मेरठ’ या किवर्डसह गुगल सर्च केलं त्यावेळी ही घटना खरी असून ती मेरठमधील असल्याची माहिती देणारे अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले.

दै. जागरणच्या वेबसाईटवर ‘अहले मोमिन के कंधों पर गई पुजारी की अर्थी’ या हेडलाईनसह बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे, तर जनसत्ताने ‘मुसलमानों ने पुजारी की अर्थी तैयार करवाई, कंधा दिया और ‘राम नाम सत्य है’ कहा’ या हेडलाईनसह बातमीला प्रसिद्धी दिलीये.

माध्यमांमधील बातम्यांनुसार रमेश माथूर हे गेल्या अनेक वर्षांपासून मेरठमधील शाहपीर गेटच्या परिसरातील कायस्थ धर्मशाळेत पत्नी रेखा सह राहत होते. ते जवळच्याच चित्रकूट मंदिरातील पूजा-अर्चा देखील पाहत असत.

गेल्या ९ दशकांपासून हे कुटुंब तेथे राहत होतं.

रमेश माथूर यांचा आजपणामुळे मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा एक मुलगा चंद्रमौली सोबतच होता आणि दुसरा मुलगा नोकरीनिमित्त दिल्लीत होता. त्या काळात पूर्ण लॉकडाऊन असल्याने दुसऱ्या मुलाला अंत्ययात्रेसाठी येणं जमलं नाही.

मुस्लिम बहुल परिसर असल्याने जेव्हा माथूर यांचा मृत्यू झाल्याचं समजलं, त्यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि त्यांनी खांदा देखील दिला आणि सर्व हिंदू रितीरिवाजानुसार माथूर यांचा अंत्यविधी पार पाडला. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर सध्या व्हायरल असलेला फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मीय व्यक्तीचे अंतिम संस्कार पार पडल्याची घटना खरी असली तरी ती सध्याची नसून जवळपास ४ महिन्यांपूर्वीची आहे. शिवाय ती पुण्यातील नसून उत्तर प्रदेशातील मेरठमधली आहे.

सोशल मीडियावरील दाव्यांप्रमाणे या घटनेचा कोरोना, डॉ. रमाकांत जोशी किंवा तब्लिगी जमात यांच्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. 

हे ही वाचा- ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युजमुळे ‘बळीचा बकरा’ ठरली का? वाचा स्पेशल रिपोर्ट!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा