Press "Enter" to skip to content

१२ तासाच्या आत परतणार असाल तर ‘रिटर्न टोल’ भरण्याची आवश्यकता नाही? गडकरींचे निवेदन? वाचा सत्य!

आजवर आपण परतीच्या प्रवासाकरिता ‘रिटर्न टोल’चे शुल्क भरत होतो. परंतु नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) कृपेने आपला १२ तासाच्या आत परतीचा प्रवास असेल तर नव्या नियमानुसार (12 hour toll rule) ‘रिटर्न टोल’ भरण्याची गरज नाही. असे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल मजकूर:

आप टोल प्लाजा पे पर्ची कटवाते हो तो वो पूछता है कि एक साइड की दू या दोनों साइड कीतो मित्रों मैं आपको बता दूं की *आप उन्हें कहें कि पर्ची 12 घण्टे की दो*ना कि डबल या सिंगल साइड*अगर आप 12 घंटे में वापस आ सकते हो तो आपको कोई वापिसी का टोल नही लगेगा*पर्ची पर भी समय लिखा होता हैजानकारी के अभाव में हम लोगों से टोल प्लाजा वाले चोर बाजारी करके हर रोज लाखों रुपया हज़म कर रहे हैआप सबसे मेरी दरखास्त है कि इस सन्देश को सब लोगों के पास पहुंचाए ओर जनता को जागरूक करेंधन्यवादनिवेदक : * नितीन गडकरी *

May be an image of 1 person and text
Source: Facebook

फेसबुक, ट्विटरवर व्हायरल होणारे हे दावे हिंदीतील दावे काही दिवसांपूर्वी मराठीतूनही व्हायरल होत होते.

‘आपण टोल नाक्यावर स्लिप काढताना तेथील कर्मचारी सिंगल किंवा रिटर्न अशा दोन बाजू विचारतात. तर मित्रांनो आपल्याला बारा तासांच्या आतील प्रवास असेल तर रिटर्न स्लिपचे पैसे भरावे लागणार नाहीत. हा संदेश सर्व लोकांना पाठवण्यासाठी आणि जनतेला जागरूक करण्यासाठी तुम्ही माझे सर्वात चांगले मित्र आहात. धन्यवाद मा. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेब, भारत सरकार’

अशा मजकुरासह नितीन गडकरींचा फोटो आणि भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ असणारे ग्राफिक्स व्हायरल होत होते.

Toll plaza return journey within 12 hours is free FB viral claims check post marathi
Source: Facebook

आता व्हायरल होत असलेल्या दाव्यांचे प्रमाण प्रचंड आहे. ‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी 9172011480 या आमच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क करून व्हॉट्सऍपवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या दाव्याविषयी पडताळणीची विनंती केली.

12 hrs return toll fake claims on facebook
Source: Facebook

पडताळणी:

  • व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले परंतु ठोस अधिकृत माहिती मिळाली नाही.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नव्याने जाहीर होणारे नियम, सुविधा यांची माहिती नेहमीच स्वतःच्या ट्विटर हँडलवर देत असतात परंतु या अशा कुठल्या प्रावधानाचा उल्लेख असणारे ट्विट आमच्या नजरेस पडले नाही.
  • शेवटी आम्ही ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शोधाशोध केली असता एक परिपत्रक सापडलं. ‘राष्ट्रीय महामार्ग टोल फी मध्ये सवलत आणि सूट’ यांविषयीच्या नियमाचे ते पत्रक होते.
  • या पत्रकात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांसह कुणाकुणास टोल फीमध्ये सूट आहे याची यादी आहे. त्याच पत्रकातील नियम क्रमांक ९ मध्ये सवलतीविषयक नियमावली आहे.
  • नियम क्रमांक ९.२ नुसार २४ तासाच्या आत दोनवेळच्या एकतर्फी प्रवासास दीडपट शुल्क आकारले जाते. दोनवेळचा एकतर्फी प्रवास म्हणजेच ‘येणे आणि जाणे’ ज्यास आपण ‘रिटर्न जर्नी’ असे म्हणतो.
toll plaza return journey fee rule GR screenshot check post Marathi
source: morth
  • हे दावे केवळ आताच नव्हे गेल्या ४ वर्षांपासून व्हायरल होत आहेत. दैनिक भास्करने या संबंधी NHAI प्रोजेक्ट डायरेक्टर विजय शर्मा यांच्याशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी टोल शुल्काचे सिंगल, मल्टीपल/डबल आणि मंथली पास अशा केवळ तीन प्रकारांचा समावेश आहे असे सांगत व्हायरल दावे फेक असल्याचे सांगितले होते.
  • त्यांच्या म्हणण्यानुसार वाहनाने एकदा टोलनाका क्रॉस केला की ‘सिंगल’ शुल्काची वैधता समाप्त होते. तेच जर तुम्ही मल्टीपल/डबल ज्यास आपण रिटर्न म्हणतो, ती पावती घेतली तर ती २४ तासाने अवैध ठरते. याचे शुल्क सिंगलच्या दीडपट असते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की टोल नाक्यावरून दोन वेळा येणे जाणे केल्यास दुप्पट शुल्क मोजावे लागते, परंतु जर आपण २४ तासाच्या आत परतणार असाल तर केवळ दीड पट शुल्क लागेल. यासाठी आपणास अगोदरच ‘रिटर्न’ची पावती काढावी लागेल. या व्यतिरिक्त कसलीही सवलत अस्तित्वात नाही. म्हणजेच व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: नितीन गडकरींनी शेतकरी आंदोलकांच्या बाजूने उभे रहात पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा