Press "Enter" to skip to content

‘ठाकरे’ सरकारला तानाशाही म्हणत फिरतेय समीत ठक्करच्या अटकेची फेक पोस्ट!

उद्धव ठाकरे सरकारला तानाशाही म्हणत गेल्या काही दिवसांपासून एक ग्राफिक व्हायरल होतेय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आणि समीत ठक्करच्या (sameet thakkar) फोटोसोबत बेड्या ठोकलेल्या हाताचे चित्र या ग्राफिक्समध्ये आहे. यावरचा मजकूर खालीलप्रमाणे :

फासीवाद की नयी मिसाल पेश करने वाली शिवसेना सरकार में आदित्य ठाकरे को ‘बेबी पेंग्विन’ कहने वाले व्यक्ती को किया गया गिरफ्तार.

समीत ठक्कर नाम के व्यक्ती ने सोशल मिडिया पर एक तस्वीर शेयर की-

जिसमें उद्धव ठाकरे के बेटे व मंत्री आदित्य ठाकरे को महाराष्ट्र का मोहम्मद आजम शाह कहते हुये ‘बेबी पेंग्विन”बताया और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को ‘मॉडर्न औरंगजेब’ बताया.

जिसके बाद समीत ठक्कर को गिरफ्तार कर लिया गया है.

देश में अभिव्यक्ती की आजादी पर हल्ला मचानेवाली दलाल मिडिया को शिवसेना सरकार की तानाशाही पर बोलने में साप क्यो सुंघ जाता है?’

शेअरचॅट या ऍपवर प्रवीण नावाच्या व्यक्तीने हे ग्राफिक शेअर केलंय.

sharechat graphic screen shot
Source: Sharechat

हेच ग्राफिक ट्विटरवर देखिल शेअर केलं जातंय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्ट निदर्शनास आल्यानंतर सर्वात आधी समीत ठक्कर (sameet thakkar) या व्यक्तीची ट्विटर वॉल तपासून पाहिली.

अगदी बातमी लिहीपर्यंत या व्यक्तीचे ताजे ट्विट्स दिसत होते. याचा अर्थ अटक झालेली नाही किंवा झाली असेल तर लगेच जामीन मिळाला असावा या शंकेने आम्ही मागच्या साधारण दोन आठवड्यापर्यंतचे ट्विट्स तपासून पाहिले.

१.प्रत्येक ट्विटमध्ये आधुनिक औरंगजेब आणि बेबी पेंग्विन असा उल्लेख

जेव्हा जेव्हा समीत ठक्कर (sameet thakkar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी ट्विट केले आहे त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावापुढे त्यांनी ‘आधुनिक औरंगजेब’ असं लिहिलंय. तसंच आदित्य ठाकरे यांना ‘बेबी पेंग्विन’ संबोधण्यात आलंय.

.पंतप्रधान नरेंद्र मोदी समीत ठक्कर यांना फॉलो करतात

समीत ठक्कर (sameet thakkar) नेमके कोण आहेत हे तपासण्यासाठी आम्ही त्यांचा ट्विटर बायो पाहिला. यात त्यांनी ‘अकाल मृत्यु वो मरे जो काम करें चांडाल का काल उसका क्या करें जो भक्त हो महाकाल का Proud to be followed by MAHADEV BHAKT @Narendramodi ji‘ असे लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खरेच या व्यक्तीला फॉलो करतात का हे तपासून पाहिले तर ती बाब खरी निघाली.

नरेंद्र मोदी यांचे ऑफिशियल अकाऊंट समीत ठक्कर यांना फॉलो ट्विटरवर फॉलो करते आहे.

narendra modi following sameet thakkar
source: Twitter

३.समीत ठक्कर यांना अटक झाली आहे का?

गुगलवर सर्च केल्यानंतर युवा सेनेचे लीगल हेड धर्मेंद्र मिश्रा यांनी व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात समीत ठक्कर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असल्याचे समजले.

१६ जुलै २०२० रोजी पब्लिश बातमीनुसार फ्री प्रेस जर्नल सोबत बोलताना मिश्रा म्हणाले ‘राज्य नेत्यांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरण्याची ही पहिली वेळ नाही. म्हणून मी त्याच्याविरुध्द तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आणि व्ही पी रोड पोलिसांशी संपर्क साधला’

पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत अश्लीलता (२ 2 २), मानहानि ()००) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम under 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत ठक्कर यांना नोटीस पाठवली असल्याचे बातमीत लिहिले आहे. परंतु या बातमीत अटकेविषयी काहीच लिहिले नव्हते. आम्ही पुन्हा समीत ठक्कर यांनी अटकेविषयी काही लिहिलं आहे का हे तपासून पाहीलं.

ट्विटरवर ‘ऊ.प्र. का छोकरा (अखिल) असे युजरनेम असलेल्या व्यक्तीने १७ जुलै २०२० रोजी ग्राफिक पोस्ट करून त्यावर समीत ठक्कर यांना टॅग केले आहे. त्यावर रिप्लाय देत ठक्कर म्हणतायेत “MAHADEV ke aashirwad se no one has yet touched me” म्हणजे ‘महादेवाच्या आशीर्वादाने अजून तरी मला कुणी स्पर्शही केलेला नाही.’

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाली आहे की १७ तारखेला अटकेच्या अफवेला नकार दिल्यानंतर आजतागायत समीत ठक्कर यांनी अगदी आतापर्यंत अनेक ट्विट-रीट्विट केल्याचे दिसत आहेत. किंबहुना उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या विषयी अवमानकारक पद्धतीने लिहिणेही थांबवल्याचे दिसत नाहीये.

याचाच अर्थ आजतागायत समीत ठक्कर या व्यक्तीला अटक झालेली नसताना सोशल मीडियामध्ये अटक झाल्याचे सांगत ग्राफिक्स फिरत आहे.

हेही वाचा: ‘महाविकास आघाडी’ सरकारवर निशाणा साधण्यासाठी ‘ऑपइंडिया’ने दिली चुकीची माहिती!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा