Press "Enter" to skip to content

भारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक!

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांसारख्या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी भारताने एका दिवसात ८६ लाख लोकांचे लसीकरण करून जागतिक विक्रम प्रस्थापित (world record in vaccination) केल्याचे दावे केले आहेत.

डॉ. हर्षवर्धन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट रीट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ‘२१ जून रोजी ८६.१६ लाख लोकांचे लसीकरण करून भारत हा एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारा जगातला पहिला देश बनला’ असल्याचे सांगत देशाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

अर्काइव्ह

याच प्रकारे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही ‘एका दिवसात ८ मिलियन डोस देणारा जगातला एकमेव देश’ असल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह

केंद्र शासनाच्या mygovindia या अधिकृत इंस्टाग्रामवरील ग्राफिक्सवर ‘World’s largest vaccine drive’ असे लिहून तोच दावा केलाय

वस्तुस्थिती:

  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘The Wall Street Journal‘ आणि ‘Nature‘ या दोन्ही वेबसाईटच्या रिपोर्ट्सनुसार चीनच्या लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिलेली आहे. यानुसार चीनमध्ये दर दिवशी जवळपास २० मिलियन म्हणजेच २ कोटी लशीचे डोस दिले जात आहेत.
  • ‘Our world in data’ या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार २१ जून २०२१ रोजी चीनमध्ये २०.५२ मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्याच वेबसाईटवर आपण पाहू शकता २१ जून रोजी चीनच्या आलेखात आणि भारताच्या आलेखात किती मोठी तफावत होती.
China vs India vaccine dose administrated on 21st June 2021 graph
Source: ‘Our world in data
  • कोरोना विषाणूला हरवण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण. भारताने उशिरा का होईना जोरकसपणे लसीकरणास सुरुवात केली आहे. २१ जून पासून लसीकरण मोहिमेने गती पकडलीय. या सर्व बाबी खऱ्या असल्या तरीही २१ जूनला ८६.१६ लाख लसी देऊन जगात विक्रम (world record in vaccination) प्रस्थापित केल्याचा दावा चुकीचा आहे.

हेही वाचा: सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमुळे सरकारचे दरमहा २५०० कोटी रुपये वाचणार असल्याचा दावा फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा