शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही सेना आणि अपक्ष आमदारांसह महाराष्ट्रातून सुरत आणि तेथून गुवाहाटीला गेले आहेत. याच दरम्यान एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय त्यात ते झुलताना दिसतायेत. दावा केला जातोय की ते दारूच्या किंवा इतर कुठल्या अमली पदार्थाच्या नशेत आहेत म्हणून त्यांना ‘शिवसेना’ असा पूर्ण शब्दही नीट उच्चारता येत नाहीये.
शिवसेना राजस्थान या फेसबुक पेजवरून हाच व्हिडीओ शेअर करत ‘बघा सत्यता गुवाहाटी फुल दारू पिऊन टाईट एकनाग शिंदे सापडले पत्रकार यांच्या हातातत्यांना त्यांच्या आजूबाजूचे गुवाहाटी पोलीस व 2 कार्यकर्ते बोलू देत नव्हतेआणि है हिंदुत्व सांगत आहेत, राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत राहू नका है सांगत आहेतभाजप सोबत जा है सांगत आहेतसमजले का पंखा फास आहे म्हणून भाजप जवळचा वाटतो आहे तसेच ही बनावट पोस्ट नाही भाजप IT सेल सारखी हा ओरिजनल व्हिडियो आहे’ असे कॅप्शन दिले आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सदर व्हिडीओच्या सत्यतेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की सदर घटना एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सुरत वरून गुवाहाटीकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळची आहे. पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी पत्रकार, पोलीस, सुरक्षा कर्मचारी यांच्यात काहीशी धक्काबुक्की झाली. शिंदे काही वेळाने सावरून उभे राहिले आणि पत्रकारांना त्यांनी उत्तर दिले.
व्हायरल व्हिडीओ क्लिपच्या पुढील व्हिडीओ:
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी बस, शेजारचा टोपी घातलेला सुरक्षा कर्मचारी आणि निळा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीच्या हालचाली तंतोतंत जुळणाऱ्या आहेत त्यामुळे दोन्ही व्हिडीओज एकाच ठिकाण/ घटनेचे आहेत हे स्पष्ट होतेय.
मूळ व्हिडीओ गायब:
‘MH04 Media’ ने सदर वृत्त प्रसारित केले होते. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला होता परंतु शिंदे समर्थक जेव्हा उत्तरादाखल त्या पूर्ण व्हिडीओची लिंक शेअर करू लागले तेव्हा फेसबुकवरून तो व्हिडीओ काढून टाकण्यात आला आहे. सदर वाहिनीचे संपादक संदीप लबडे यांना आम्ही संपर्क साधून खुलासा मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
शिंदे यांची दुसरी प्रतिक्रिया:
एकनाथ शिंदे गट सुरत वरून गुवाहाटीला पोहचल्यानंतर विमानतळावरच पत्रकारांनी शिंदेंना पुन्हा घेराव घातला त्यावेळी त्यांनी दिलेली दुसरी प्रतिक्रिया सुद्धा ते नशेत असल्याचे दर्शवत नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे नशेत असल्याचे दर्शविणारी व्हायरल व्हिडीओ क्लिप अर्धवट आहे. त्याच क्लिपच्या मूळ व्हिडीओमध्ये शिंदे पत्रकारांना व्यवस्थित प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यामुळे एका अर्धवट क्लिपच्या आधारे एकनाथ शिंदे दारू किंवा इतर अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा ठोसपणे दावा करणे म्हणजे दिशाभूलच असल्याचे स्पष्ट होतेय.
हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी टिळा लाऊन एकनाथ शिंदेंना दिला होता आशिर्वाद? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
[…] […]
Make money 24/7 without any efforts and skills. https://res.seamonkey.es/gotodate/go