Press "Enter" to skip to content

पावसाळी अधिवेशनात माजी आमदारांच्या पेन्शन वाढीच्या निर्णयाचे व्हायरल मेसेज चुकीचे!

विधानसभेच्या दीड दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात इतर महत्वाचे विषय सोडून माजी आमदारांची मासिक पेन्शन २५ हजारावरून थेट ४० हजार करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होतायेत. (Former MLA pension increase)

Advertisement

‘गरीबांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र विधीमंडळाचा अभिनंदनीय निर्णय’ अशा उपहासात्मक मथळ्याखाली ऍड. गिरीश दुबे यांच्या नावाने सदर पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत आहे.

नुकत्याच झालेल्या दीड दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्या निर्णयाद्वारे राज्यातील सर्व माजी आमदारांना मिळत असलेले निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन फक्त 40 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे .2011 मध्ये या गरीब आमदारांना केवळ 25 हजार रुपये वेतन करून देण्यात आले होते .आता हे पेन्शन चाळीस हजार रुपये प्रतिमाह या प्रमाणे मिळणार आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे सध्या देशात 822 माजी आमदार हयात असून 750 मृत आमदारांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन अर्थात फॅमिली पेन्शन मिळत आहे.

या अशा मजकुरासह पेन्शनमधील रक्कम वाढवली असल्याचा दावा करण्यात येतोय.(Former MLA pension increase)

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=175116414172881&id=100050235707356

व्हॉट्सऍपवर व्हायरल होणाऱ्या दाव्याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी संपर्क साधून पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

पडताळणी करण्यासाठी आम्ही (Former MLA pension increase) व्हायरल पोस्टमधील कीवर्डस गुगल सर्च करून पाहिले तेव्हा. या पोस्ट मधील बहुतांश मजकूर तंतोतंत जुळणारी बातमी आमच्या समोर आली.

‘महाराष्ट्र टाईम्स’ टाईम्सने ‘मा.आमदारांचे पेन्शन ४० हजारांवर’ या शीर्षकाखाली सदर बातमी पब्लिश केली आहे. परंतु महत्वाचा भाग म्हणजे ही बातमी प्रसिद्ध झाल्याची तारीख आहे ५ ऑगस्ट २०१३.

२०१३ सालच्या म्हणजेच ७ वर्षांपूर्वीच्या अधिवेशनातच हे निवृत्तीवेतन २५ हजारावरून ४० हजारांवर नेण्यात आले आहे. तसेच एका टर्मपेक्षा अधिक काळ आमदारकी भूषविली असेल, तर त्या पेन्शनमध्ये दर वर्षासाठी अतिरिक्त दोन हजार रुपयांची पेन्शन वाढ असेल असेही बातमीत सांगण्यात आले आहे.

हा बदल आताही तसाच आहे की यात आणखी काही बदल झालेत हे तपासण्यासाठी पुन्हा सर्च केले असता आम्हाला झी २४ तास ची ९ ऑगस्ट २०१६रोजीची एक बातमी सापडली. या बातमीनुसार यावेळीही पावसाळी अधिवेशनात काही नव्या घोषणा करण्यात आल्या. यात आजी माजी आमदारांच्या वेतन/निवृत्तीवेतनासह इतरही लाभ समजू शकतील.

काय आहेत बदललेले लाभ?

  • आमदारांचे वेतन – 75 हजार रुपयांवरून दीड लाख रुपये 
  • आमदारांचे निवृत्तीवेतन: ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये
  • याशिवाय प्रत्येक टर्मला १० हजारांची अतिरिक्त पेन्शन वाढ
  • आमदारांच्या पीएंचा पगार १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
  • १० हजार रुपये पगार देऊन टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची मुभा
  • मंत्र्यांचा पगार १ लाख ८० हजार ते २ लाखांच्या घरात.

पोस्टकर्ते ऍड. गिरीश दुबे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी ही पोस्ट बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिली असून आता खोडसाळपणा करत कुणी नवे संदर्भ देत रीपोस्ट केल्याचे स्पष्ट केले. या व्हायरल पोस्टमध्ये त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिला गेल्याने त्यांना अनेक फोन गेले आहेत. या फोन मध्ये माजी आमदाराचाही समावेश होता.

दुबे यांच्या म्हणण्यानुसार त्या माजी आमदाराने ‘आता मिळणारे ५० हजार घटून पुन्हा ४० हजार होणार नाही ना?’ या चिंतेने विचारणा करण्यासाठी फोन केला होता.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की आमदारांच्या निवृत्तीवेतनाबाबत व्हायरल होणारी (Former MLA pension increase) पोस्ट जुनी असून त्यात नव्याने काही बदल करत व्हायरल केली आहे. माजी आमदारांच्या निवृत्तीवेतनात वाढ करून ते ४० हजार करण्याचा निर्णय २०१३ सालीच झालाय. त्यानंतर २०१६ हे वेतन ५० हजारावर गेले आहे.

हेही वाचा: जुन्या टीव्ही-रेडीओमध्ये करोडोच्या भावात जाणारी ‘रेड मर्क्युरी’? जाणून घ्या सत्य की अफवा!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा