Press "Enter" to skip to content

जिल्हाधिकाऱ्यांच्या फेक व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवल्यास ‘या’ व्यवसायावर होईल पुन्हा परिणाम!

गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना देणारे मेसेज (collectors message regarding coronavirus) व्हायरल होतायेत.

Advertisement

काय आहेत व्हायरल मेसेज?

पुणे कलेक्टर कडून सूचना :

लवकरच कोरोना 3rd स्टेजला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :

*चिकन मटन बंद
*शेजारि पाजारि बंद
*कोणा सोबत फ़िरणे बंद
*गरम पाणी सर्व गरजानसाठि वापरणे
*ब्रेड, पाव, बेकरी सामान बंद
*बाहेरील व्यक्ती घरा मधे कोणत्याहि कामासाठी घेवु नये.

  1. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.
  2. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.
  3. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.
  4. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका.
  5. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.
  6. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.
  7. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.
  8. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. दसरा, दिवाळी, में महिना वगैरे नंतर बघुया.
  9. घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.
  10. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.
  11. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.
  12. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.
  13. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.
  14. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.
  15. कपड्याना इस्त्री घरीच करा.
  16. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.
  17. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या

अजुन सविस्तर माहिती:

स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या.. आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.

– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

हे असे मेसेज केवळ पुणेच नव्हे तर अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे व्हायरल होत आहेत. पुण्यात व्हायरल होत असलेल्या मेसेजबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय सोनटक्के यांनी माहिती दिलीय.

पडताळणी:

व्हायरल पोस्टची पडताळणी करत असतानाच ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन यांनी दैनिक लोकमतची आजचीच २२ सप्टेंबर २०२० रोजीची बातमी निदर्शनास आणून दिली. या बातमीनुसार नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने हे’ व्हायरल मेसेज त्यांच्याकडून गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. हीच परस्थिती इतरही जिल्ह्यांची. एकच मेसेज विविध जिल्ह्यांच्या कलेक्टर्सच्या (collectors message regarding coronavirus) नावे फिरतोय परंतु यास कुठलाही आधार नाही.

lokmat news to rubbish claims of viral msg by collectors
Source: Lokmat

व्हायरल पोस्टचा उद्देश अर्थातच लोकांना कोरोना व्हायरसद्वारे पसरलेल्या महामारीपासून वाचवणे हाच असला, तरीही त्यातील काही दावे यापूर्वीच खोडून काढण्यात आले आहे.

त्यातील सर्वात महत्वाचे दोन दावे ज्यांमुळे त्या दोन व्यवसायांना अगोदरच प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

१. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो?

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि इतरही संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स हेच सांगताहेत की वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरणे तितकेसे शक्य नाही. मुळात त्यांच्या छपाईसाठी वापरण्यात आलेली पद्धती, शाई, सच्छिद्र कागद हे असे घटक आहेत जे कोरोना व्हायरसला त्या पृष्ठ भागावर फार काळ तग धरू देत नाहीत.

तरीही अगदीच काळजी म्हणून वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर आपण हात सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.

२. चिकन, मटण आणि मासे खाणे बंद करावे?

व्हायरल दाव्यात ‘चिकन मटण’ बंद असं अगदी सुरुवातीलाच लिहिले आहे. परंतु भारताचे ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSI) यांच्याकडून मांसाहार करण्यास कुठलाही धोका नसून चिकन, मटण आणि माशांच्या सेवनाने कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

देशात कोरोनाचा फैलाव होण्याच्या अगदी पहिल्या टप्प्यात अशाच अफवा पसरल्या होत्या आणि पोल्ट्री फार्म्स चालवणारे उद्योजक, शेतकरी अक्षरशः हतबल झाले होते. त्यांना प्रचंड मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.

वस्तुस्थिती:

कोरोना व्हायरस संदर्भात कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने अशा काही सूचना दिलेल्या नसून व्हायरल मेसेज फेक आहे. मेसेज मागचा उद्देश चांगला असला, त्यातील बहुतांश बाबी महत्वाच्या असल्या तरीही वृत्तपत्रे आणि मांसाहाराच्या सेवनाबद्दल असणाऱ्या सूचना अगदीच निराधार आणि अशास्त्रीय आहेत.

तज्ज्ञांच्या मते वृत्तपत्रे किंवा चिकन-मटणचे सेवन केल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकत नाही. परंतु ते घेताना, देताना, आणताना जर मास्कविषयी सूचनांचे, सोशल डिस्टन्सचे योग्य पालन न केल्यास धोका निर्माण होण्याच्या शक्यता नक्कीच अधिक आहे.

हेही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने कोरोना जातो सांगणाऱ्या व्हायरल पोस्ट फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा