Press "Enter" to skip to content

नितीन गडकरींनी शेतकरी आंदोलकांच्या बाजूने उभे रहात पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले?

शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आंदोलनजीवी’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर संविधानाने नागरिकांना आंदोलनाचा अधिकार दिला असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी मोदींच्या विरोधात वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. (nitin gadkari on andolanjeevi remark)

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र भडके, जेकब डीकुन्हा आणि अविनाश घोडके यांनी सदर व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून सत्यता पडताळण्याची विनंती केली.

फेसबुक आणि ट्विटरवर हा व्हिडिओ ‘प्रधानमंत्री जी के आंदोलनजीवी कहने पे गडकरी जी का शानदार जवाब…’ अशा कॅप्शनसह व्हायरल होताना दिसत आहे. (nitin gadkari on andolanjeevi remark)

प्रधानमंत्री जी के आंदोलनजीवी कहने पे गडकरी जी का शानदार जवाब….

Posted by श्री.गणेश बाळाराम मातोंडकर on Tuesday, 9 February 2021

अर्काइव्ह लिंक

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीची सुरुवात करताना सर्वात आधी (nitin gadkari on andolanjeevi remark) व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित ऐकला. यामध्ये अण्णा हजारे, रामदेव बाबा, भ्रष्टाचार असे शब्द गडकरींनी वापरल्याचे दिसले. यावरून अंदाज करत ऍडव्हान्स कीवर्ड सर्चच्या माध्यमातून गुगल सर्च केले असता भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर १६ ऑगस्ट २०११ रोजी अपलोड झालेला व्हिडीओ आम्हला सापडला.

या व्हिडीओचा कालखंड, नितीन गडकरी यांचे कॉंग्रेस, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा या संदर्भातील वक्तव्य या द्वारे सहज लक्षात येईल की सदर व्हिडीओ अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्यांनी भ्रष्टाचार विरोधात केलेल्या लोकपाल आंदोलनासंबंधी हे वक्तव्य आहे. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की सदर व्हायरल व्हिडीओ २०११ सालचा आहे. नितीन गडकरी पंतप्रधानांना नागरिकांच्या आंदोलनाच्या संवैधानिक अधिकाराबद्दल आठवण करून देत असले तरी हे वक्तव्य सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नसून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधातील आहे.

हेही वाचा: राहुल गांधींनी जनसामान्यांत जेवल्याचं दाखवण्यासाठी फोटोसेशन केलं, पण मास्क काढायचं विसरले?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा