Press "Enter" to skip to content

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या मंदिरातील व्हिडीओचा कोरोनाशी संबंध नाही, व्हायरल दावे चुकीचे !

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा अर्डेन यांनी ज्या पद्धतीने कोरोनावर नियंत्रण मिळवलं, त्यासाठी त्यांचं जगभरात कौतुक होतंय. सगळीकडे त्यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा केली जातेय. 

भारतात सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल व्हायला लागलाय. या व्हिडिओमध्ये जेसींडा अर्डेन कुठल्याशा हिंदू मंदिरात (new zealand pm temple) जाताना आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मंदिरात हात जोडून उभ्या राहिलेल्या दिसताहेत.

Advertisement

सोशल मीडियात दावा करण्यात येतोय की ‘तो’ व्हिडीओ न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्यानंतर पंतप्रधान मंदिरात जाऊन दर्शन घेत असतानाच आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याबद्दल पंतप्रधान हिंदू मंदिरात जाऊन हिंदू देवतेपुढे लिन झाल्याचे सुचवण्याचा प्रयत्न केला जातोय.  

अर्काइव्ह पोस्ट

posts claiming new zealand pm went in temple after country got relief from corona
Source: Facebook
posts claiming new zealand pm went in temple after country got relief from corona
Source: Facebook

पडताळणी:

सोशल मीडियावरील दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही ‘new zealand pm temple’ या किवर्डसह गुगल सर्च केलं, त्यावेळी आम्हाला ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ बघावयास मिळाला.

Credit : YouTube

‘हिंदुस्तान टाईम्स’नुसार न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा अर्डेन यांनी ६ ऑगस्ट रोजी ऑकलंड येथील राधा कृष्णा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरातील सर्व नियमांचे विधिवत पालन केले. यावेळी भारताचे राजदूत मुक्तेश परदेशी हे देखील उपस्थित होते.

मुक्तेश परदेशी यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. परदेशी यांच्या ट्विटनुसार राधा कृष्णा मंदिराच्या भेटीत अर्डेन यांनी भारतीय पद्धतीच्या पुरी, छोले आणि डाळ हे शाकाहारी पद्धतीचं भोजन देखील ग्रहण गेलं.

त्यानंतर हाच व्हिडीओ आम्हाला ‘स्क्रोल डॉट इन’च्या वेबसाईटवर देखील आढळला. स्क्रोलच्या रिपोर्टनुसार न्यूझीलंडमध्ये पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्डेन यांनी राधा कृष्णा मंदिराला भेट दिली होती.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने देखील आपल्या बातमीत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा अर्डेन यांनी राष्ट्रीय निवडणुकांच्या तोंडावर ऑकलंड येथील राधा कृष्ण मंदिराला भेट दिल्याचं सांगितलं आहे. याशिवाय इतरही अनेक न्यूज वेबसाईटने यासंबंधीच्या बातम्या दिल्या आहेत.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा अर्डेन यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा आणि न्यूझीलंड कोरोनामुक्त होण्याचा काहीही संबंध नाही.

न्यूझीलंडमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या तोंडावर तेथील भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान जेसींडा अर्डेन यांनी ऑकलंड येथील राधा कृष्ण मंदिराला भेट दिली होती.    

हे ही वाचा- राम-सीता असलेली इंग्रजांची नाणी फेक; अशी कुठली नाणी अस्तित्वातच नव्हती!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा