Press "Enter" to skip to content

ना ‘तो’ व्हायरल व्हिडीओ गौताळा घाटातला, ना त्यातील व्यक्तींवर वाघाचा हल्ला झालाय!

सोशल मीडियावर त्यातही प्रामुख्याने व्हाट्सअँपवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओत गंभीरीत्या जखमी झालेल्या दोन रक्तबंबाळ व्यक्ती दिसताहेत. दावा केला जातोय की व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा घाट, कन्नड येथील असून व्हिडिओतील व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात घायाळ झाल्या आहेत.

Advertisement

“गौताळा घाट,कन्नड,वाघाने हमला करून मोटरसायकल चालकांना घायाळ केले” अशा कॅप्शनसह सदर व्हिडीओ व्हायरल होतोय.

Source: Whatsapp

फेसबुकवर ‘मराठा तेज’ या पेज वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बातमी करेपर्यंत यास साडे तीन हजार लोकांनी पाहिल्याचे दिसले. युट्युबवर देखील हा व्हिडीओ अशाच दाव्यांसह अपलोड करण्यात आला आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • व्हायरल व्हिडीओ खरंच गौताळ्यातला आहे का आणि व्हिडिओत दिसणारे दोघे खरंच वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत का, हे शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली.
  • गेल्या काही दिवसांमध्ये गौताळा घाटात अशा प्रकारची कुठलीही घटना घडली असल्याची बातमी आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मिळाली नाही.  
  • त्यानंतर व्हिडीओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता ‘इंडिया टीव्ही आवाज महाराष्ट्राचा’ या पोर्टलवर यासंदर्भातील बातमी सापडली.
  • बातमीनुसार सदर घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शिवर तांडा येथील आहे. शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तंटा झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. दामासिंग चंदु राठोड, दारासिंग चंदू राठोड आणि विष्णू चंदु राठोड अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
  • व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या जखमा आणि शेजारी पडलेले हेल्मेट ही दृश्ये तंतोतंत जुळणारी आहेत. तसेच व्हिडीओमध्ये बंजारा समाजाची भाषा ऐकू येतेय, ती भाषा बातमीतील नावांशी जुळणारी आहे.
  • सदर व्हिडीओ ‘पत्रकार शक्ती’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर देखील ८ जुलै २०२१ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. आम्ही ‘पत्रकार शक्ती’चे संपादक ओंकार चेके यांच्याशी देखील संपर्क साधला.   
  • “आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन शहानिशा केलीय, स्वतः काही व्हिडीओज फोटोज घेतले आहेत त्यामुळे आम्ही या बातमीविषयी शतप्रतिशत ठाम आहोत.” असे ओंकार चेके यांनी ‘चेकपोस्ट मराठी’शी बोलताना सांगितले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर गौताळा घाटात वाघाच्या हल्ल्यात मोटारसायकल स्वार जखमी झाल्याच्या दाव्यासह व्हायरल होणारा व्हिडीओ ना गौताळा घाटातला आहे, ना व्हिडिओतील इसम वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शिवर तांडा येथील घटनेचा आहे. शेतीच्या वादातून झालेल्या झालेल्या भांडणात एका पक्षाने दुसऱ्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या या इसमाचा व्हिडीओ वाघाच्या हल्ल्याचा म्हणून शेअर केला जातोय.

हेही वाचा- मुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत? वाचा सत्य! 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा