Press "Enter" to skip to content

टाटा कंपनी तर्फे व्हॅलेन्टाईन डे निमित्त प्रश्नमंजुषा खेळून गिफ्ट्स मिळवण्याची संधी खरी आहे का?

व्हॅलेन्टाईन डे निमित्त टाटा, हॉटेल ताज यांच्या नावे स्मार्टफोन्स सारख्या किमती गिफ्ट्स मिळवण्याची संधी असल्याचे सांगत काही लिंक्सचे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. (Tata valentine day gift)

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी सदर व्हायरल मेसेज आम्हाला फॉरवर्ड करून पडताळणी करण्याची विनंती केली.

Source: Whatsapp

‘विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि व्हॅलेन्टाईन डे निमित्त गिफ्ट्स मिळवा. मी या प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला आणि मोबाईल फोन जिंकला. माझ्या मित्राला सुद्धा रक्कम मिळाली.

Advertisement
‘ अशा आशयाचा मजकूर आणि त्यासोबत वेबसाईट लिंक असलेला तो मेसेज आहे.

(Tata valentine day gift) याच प्रकारे ताज हॉटेल मध्ये मोफत ७ दिवस राहण्याची संधी असल्याचे दावे करणारेही मेसेज व्हायरल होतायेत.

Source: news meter

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यासाठी (Tata valentine day gift) व्हायरल मेसेजमधील लिंक्सचे बारकाईने निरीक्षण केले. या लिंक्स टाटा समूहाच्या अधिकृत वेबसाईट्सच्या नसून भलत्याच काहीतरी असल्याचे दिसले. त्यातून शंका बळावली. त्यामुळे टाटा समूहाने आपल्या अधिकृत वेबसाईट किंवा सोशल मिडिया हँडल्सवरून अशी काही गिफ्ट्स देणारी प्रश्नमंजुषा जाहीर केलीय कि काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

काय आहे हॉटेल ताज चे म्हणणे?

‘हॉटेल ताज’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हायरल मेसेज आणि त्यातील दावे मोडीत काढत अशी कुठलीही फ्री गिफ्ट कुपन्सची योजना आम्ही जाहीर केली नसल्याचे सांगितले आहे.

टाटा ग्रुपचे म्हणणे काय?

टाटा ग्रुपने व्हायरल मेसेज आणि त्यातील दावे फेक असल्याचे सांगण्यासाठी अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओच पोस्ट केलाय. यातील लिंक आणि दावे आमचे नाहीत अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी नेहमी त्यांचा स्रोत पाहूनच पाउल उचलावं असा सल्ला दिलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हॉटेल ताज आणि टाटा ग्रुपच्या नावे व्हॅलेन्टाईन डे निमित्त (Tata valentine day gift) गिफ्ट्स आणि कुपन्स मिळवण्याची संधी म्हणत जे मेसेज व्हायरल होतायेत ते फेक असल्याचे सिद्ध झाले. अशा कुठल्याही संशयास्पद लिंक्सवर क्लिक करून आपली खाजगी माहिती देणे धोक्याचे आहे. यातून आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.

हेही वाचा: .२०२० हे केवळ जिवंत राहण्याचं वर्ष!’ असा व्हायरल संदेश रतन टाटा यांनी कधी दिलाच नव्हता!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा