Press "Enter" to skip to content

‘आयसीएमआर’ किंवा ‘नीती आयोगा’ने मुंबई मॉडेलचं कौतुक केलेलं नाही, ‘टीव्ही ९ मराठी’ची बातमी फेक !

‘कोरोनाविरुध्दचं मुंबई मॉडेल देशभरात राबवण्यात येणार आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई मॉडेलने प्रसार रोखला जाईल. ‘आयसीएमआर’ आणि ‘नीती आयोगा’च्या बैठकीत मुंबई मॉडेलचं कौतुक करण्यात आलंय. मुंबई मॉडेलमध्ये ज्येष्ठांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येते. मुंबई मॉडेलनुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे बेड वाढविण्यात आले.’

Advertisement

‘टीव्ही ९ मराठी’ या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीने काल दिनांक २८ मे रोजी दिलेली ही बातमी. ही बातमी ‘टीव्ही ९ मराठी’ने आपल्या वेबसाईटवर देखील अपलोड केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील मुंबई महापालिकेच्या कामगिरीचे आयसीएमआर आणि नीती आयोगाकडून झालेल्या कौतुकाची बातमी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली.

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात केलेले दोन ट्वीट सोबत जोडलेले आहेत. जितेंद्र आव्हाड याचं पहिलं ट्वीट १४० वेळा तर, दुसरं ट्वीट ३३९ वेळा रिट्वीट करण्यात आलंय.

फेसबुकवर देखील अनेक युझर्सनी ही बातमी शेअर केलीये. राष्ट्रीय स्तरावरील अतिशय महत्वाच्या अशा या दोन्हीही संस्थांनी कौतुक केलेलं कोरोना विरुद्धचं  ‘मुंबई मॉडेल’ देशभरात राबविण्यात येणार असल्याचा दावा, या पोस्टस सोबत करण्यात येतोय.

महाराष्ट्रात हा दावा प्रामुख्याने ‘टीव्ही ९ मराठी’च्या बातमीनंतर व्हायरल झाला असला तरी काहीश्या अशाच आशयाची बातमी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने देखील छापली होती.

पडताळणी:

जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्या ज्या लोकांनी ट्विटरवर याविषयी ट्विट केले आहेत त्यात एक समान धागा होता तो म्हणजे ‘TV9 मराठी’च्या बातमीचे स्क्रीनशॉट. ‘मुंबई मॉडेल’ देशभरात राबवायचे आहे असे नीती आयोग आणि ICMR यांच्या बैठकीत ठरत असेल तर ही नक्कीच राष्ट्रीय बातमी आहे. म्हणजेच ती इतरही सर्व वाहिन्यांवर यायला हवी होती. मग सगळीकडे फक्त ‘TV9 मराठी’च का दिसत आहे. हे पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली.

‘चेकपोस्ट मराठी’ने याची पडताळणी करायला सुरुवात केली. ‘ICMR on Mumbai corona model’ ह्या कीवर्डसह गुगल सर्च केल्यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’ वगळता मेन्सट्रीम मिडीयामध्ये या दाव्यांना दुजोरा देणारी कुठलीही बातमी मिळाली नाही. उलट ‘हिंदुस्तान टाईम्स’ मधील बातमीनुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६२.९९ टक्के रुग्ण आणि एकूण मृत्यूपैकी ५७.८२ टक्के मृत्यू मुंबईत झाले असल्याची आकडेवारी मिळाली.

त्यानंतर मग आम्ही ‘नीती आयोगा’चं ट्वीटर हँडल चेक केलं. ‘नीती आयोगा’ने काल रात्री साडेनऊच्या सुमारास यासंदर्भात ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. नीती आयोगाने ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित बातमीची लिंक शेअर करून ‘ती’ बातमी तथ्यात्मकरित्या चुकीची असल्याचे सांगून मुंबईतील परिस्थिती चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘आयसीएमआर’ किंवा ‘नीती आयोगा’कडून कोरोनाविरोधातील मुंबई मॉडेलचं कौतुक करण्यात आलेलं नाही.

‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित बातमीमध्ये किमान ‘मुंबई मॉडेल’ देशभरात राबविण्याविषयीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मात्र ‘टीव्ही ९ मराठी’ने तर हे मॉडेल देशभरात राबवण्यात येणार असल्याविषयीची खात्रीशीर बातमी दिलीये.  त्यामुळे ‘टीव्ही ९ मराठी’ची बातमी १०० टक्के फेक ठरते.

हे ही वाचा- आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या होमिओपॅथीक ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ गोळ्या कोरोनावरचा रामबाण उपाय आहे का?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा