Press "Enter" to skip to content

सोनिया गांधी यांच्या नावाबद्दल मुंबई हायकोर्टाने कुठलीही टिपण्णी केलेली नाही!

सोशल मिडीयावर मुंबई हायकोर्टाचा सोनिया गांधी यांच्या संबंधीचा एक आदेश शेअर करण्यात येतोय.

Advertisement

‘कोणत्याही व्यक्तीला तिच्या मूळ नावाने संबोधणे गुन्हा नाही. सोनिया गांधी यांना अँटनिया मायनो म्हणणे गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट.’

मुंबई हायकोर्टाच्या हवाल्याने सोशल मिडीयावर सोनिया गांधी यांच्या संदर्भातील हा दावा फिरवण्यात येतोय.

पडताळणी

मुंबई हायकोर्टाच्या या कथित दाव्याबद्दल पडताळणी सुरु केली असता आमच्या लक्षात आलं की धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीव्ही पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोर्टात सुरु असलेल्या केसच्या संदर्भाने हे दावे करण्यात येत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अर्णब गोस्वामी चौकशीला सामोरे जात आहेत.

आम्ही सर्वप्रथम या प्रकरणातील सुनावणीचा आढावा घेतला. या प्रकरणातील १२ जून रोजीच्या सुनावणीपूर्वी सोशल मिडीयावर सोनिया गांधींच्या नावासंबंधी दावे करण्यात यायला लागले होते.

सोशल मिडीयावरील पोस्टवरून त्यांची तारीख ११ जून असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे ११ जूनपूर्वी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने असा काही आदेश दिला आहे का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मुंबई हायकोर्टात ११ जूनपूर्वीची सुनावणी ९ जून रोजी झाली होती. मुंबईतील पायधुनी पोलिसांनी १० जून रोजी अर्नब गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलाविले होते. त्याविरोधात अर्नब गोस्वामी यांनी तातडीची याचिका दाखल केली होती.  

पायधुनी पोलीस स्टेशन कंटेनमेंट झोन मध्ये येत असल्याने आपल्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात न जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती गोस्वामी यांनी आपले वकील हरीश साळवे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात केली होती. परंतु मुंबई हायकोर्टाने गोस्वामी यांची ही मागणी धुडकावून लावली आणि चौकशीसाठी एन.एम. जोशी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

High court notice to Arnab Goswami

या संपूर्ण सुनावणी दरम्यान सोनिया गांधींच्या नावाच्या संदर्भाने कुठलीही चर्चा झाली नाही. किंवा मुंबई हायकोर्टाने त्या संबंधित कुठलेही आदेश दिलेले नाही. गोस्वामी यांची चौकशीसाठी अनुपस्थित राहण्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर वेळेच्या कमतरतेअभावी पुढच्या सुनावणीसाठी १२ जून ही तारीख ठरविण्यात आली.

वस्तुस्थिती

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की मुंबई हायकोर्टाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी, त्यांना अँटनिया मायनो म्हणावे की म्हणू नये, याविषयी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. कुठलाही आदेश दिलेला नाही. सोशल मिडीयावर केल्या जात असलेले दावे निराधार आणि फेक आहेत.   

हेही वाचा: ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’च्या को-प्रोड्युसरने राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्यासाठी वापरला एडीटेड व्हिडीओ!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा