Press "Enter" to skip to content

‘अतिक्रमणातल्या मशिदी BMCला दिसत नाहीत’ सांगत फिरवला जातोय मध्यप्रदेशातला फोटो!

कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद रंगत असताना बृहन्मुंबई महानगर पालिकेने (BMC) कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अवैध असल्याचे सांगत त्यावर बुलडोझर चालवला. हीच तत्परता अतिक्रमणातील मशिदी पाडण्यासाठी BMC का दाखवत नाहीये असा सवाल करत सोशल मीडियात एक (middle of the road mosque) फोटो प्रचंड व्हायरल झालाय.

Advertisement

रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या मशिदीचा (middle of the road mosque) फोटो आणि त्यासोबत ‘मुंबई में 200 से ज्यादा अवैध मस्जिदें हजारों मजारें सड़कों के बीच बनी हैं! पर BMC को सिर्फ कंगना का ऑफिस अवैध निर्माण लगा! #लानत_हैअसा मजकूर व्हायरल होत आहे.

फेसबुक युजर विकास पवार यांनी सदर पोस्ट शेअर केलीय. त्यावर बातमी करेपर्यंत १११ कमेंट्स असून ती पोस्ट ९५१ लोकांनी शेअर केलीय.

मुंबई में 200 से ज्यादा अवैध मस्जिदें हजारों मजारें सड़कों के बीच बनी हैं!पर BMC को सिर्फ कंगना का ऑफिस अवैध निर्माण लगा!

Posted by Vikas Pawar on Wednesday, 9 September 2020

अर्काईव्ह लिंक

विकास पवार यांची प्रोफाईल तपासली असता ते उत्तरप्रदेश भाजपशी निगडीत असणारे नेते असल्याचे समजले.

vikas pawar bjp profile checkpost marathi
Source: Facebook

याच कॅप्शनसह ‘पवन चौधरी जिलाध्यक्ष’ असे या ट्विटर युजरनेही रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या मशिदीचा (middle of the road mosque) फोटो शेअर केलाय. गाजियाबादच्या हिंदू जागरण मंचचे ते जिल्हाध्यक्ष असल्याचं त्यांनी बायोमध्ये लिहिलंय.

अर्काईव्ह लिंक

याच पद्धतीने कॅप्शनला कॉपी पेस्ट करून शेकडो ट्विटर हँडल्सवर हा फोटो शेअर झाल्याचे दिसून येते.

Viral tweets to claim masjid in between the road checkpost marathi
Source: Twitter

पडताळणी:

व्हायरल फोटो आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला तेव्हा ‘जॉब व्हेकेन्सी’ या पोर्टलवर हा फोटो अपलोड केला असल्याचे दिसले. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा चार महिन्यांनी ‘कात्रा बाजार, सागर’ मध्ये रक्षाबंधनानिमित्त एवढी गर्दी पहायला मिळतेय असे त्यावर लिहिले आहे.

हे ‘कात्रा बाजार सागर’ कुठे आहे शोधण्यासाठी आम्ही गुगल सर्च केले तेव्हा लक्षात आले की ‘सागर’ हे मध्यप्रदेशातील जिल्ह्याचे शहर आहे. याच आधारावर ‘mosque in katra bazar sagar’ असे सर्च केल्यानंतर ‘जस्ट डायल‘वर आम्हाला ‘जामा मस्जिद, सागर’चा फोटो मिळाला. तो व्हायरल फोटोशी तंतोतंत जुळणारा आहे.

just dial and viral photo comparison checkpost marathi.jpg

युट्युबवर याच मशिदीचा एक व्हिडीओ ४ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केलेला आहे. त्यातही ही मस्जिद मध्यप्रदेशातील ‘सागर’ येथील असल्याचे सांगण्यात आलेय.

तरीही पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी म्हणून आम्ही गुगल मॅपवर ‘Jama Masjid Sagar Madhyapradesh’ असे सर्च करून पाहिले तेव्हा सॅटेलाईट व्ह्युवमधून मशीदीवर असणारा गोलाकार हिरवा पत्रा आणि रस्त्याच्या मधोमध असणारी इमारत पाहून पूर्णतः खात्री पटली.

jama masjid sagar on map checkpost marathi
Source: Google Map

वस्तुस्थिती:

कंगना राणावतच्या ऑफिसवरील कारवाईचा विरोध करत बृहन्मुंबई महानगर पालिकेवर ताशेरे ओढण्यासाठी अतिक्रमणातील मशिदींचा मुद्दा उचलला. परंतु या पोस्ट टाकताना ज्या (middle of the road mosque) मशिदीच्या फोटोचा आधार त्यांनी घेतला आहे तो ‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये मुंबईचा नसून मध्यप्रदेशातील असल्याचे सिद्ध झालेय.

हेही वाचा: कालीमातेच्या मूर्तीला अपघाताने आग; पण भाजप नेत्याने दिला धार्मिक द्वेषाचा रंग!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा