राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि AIMIM पक्षाचे नेते असदुद्दिन ओवैसी (Asaduddin Owaisi) अगदी टोकाच्या विचारधारा असणारे दोन नेते अगदी शेजारी शेजारी बसल्याचा एक फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
‘मोहन भागवत के यहां हैदराबादी खिचड़ी बनाने पहुंचे ओवैसी हमने तो पहले ही बोल दिया था यह बीजेपी का एक एर्जेंट है हिंदुओं को गाली देंगे और अपने राजनीतिक रोटी सीखेंगे बीजेपी के एर्जेंट को देख लो अंध भक्तों का यह जीजा है’ अशा कॅप्शनसह फोटो शेअर केला जातोय.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप या सर्व माध्यमांतून सदर फोटो जोरदार शेअर केला जातोय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केला असता ‘डेक्कन हेराल्ड‘ची 21 डिसेंबर 2021 रोजीची बातमी सापडली. यामध्ये स्पष्टपणे पाहू शकतो की सोफ्यावर मोहन भागवत यांच्याशेजारी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) बसले आहेत.
वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शननिमित्त हे नेते एकत्र आले होते.
या फोटोवरून कॉंग्रेसने समाजवादी पक्षावर निशाणा साधत ‘सपा’ मधील ‘स’ म्हणजे ‘संघवाद’ असल्याचे म्हंटले होते.
राजस्थान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल (Arjun Meghwal) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरसंघचालक भागवत यांचे आशीर्वाद घेतल्याचे ट्विट केले होते.
याचाच अर्थ मोहन भागवत यांच्या शेजारी बसलेल्या मुलायमसिंह यादव यांना एडीट करून त्याजागी असदुद्दिन ओवैसी यांना बसविल्याचे स्पष्ट होतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सरसंघचालक मोहन भागवत आणि AIMIM नेते असदुद्दिन ओवैसी एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसल्याचे दर्शवणारा फोटो एडीट केलेला आहे. मूळ फोटोमध्ये सपा नेते मुलायमसिंह यादव बसले होते.
हेही वाचा: मोहन भागवत, अमित शहा यांसारख्या बड्या नेत्यांचे स्विस बँकेत खाते? विकीलीक्सची यादी खरी?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment