Press "Enter" to skip to content

मोहोम्मद पैगंबर यांच्या संबंधीच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ लाखो अरबी लोक उतरले रस्त्यावर?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलवरील चर्चेत प्रेषित मोहोम्मद पैगंबर (Mohommad Paigambar) यांच्या संबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले. शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेक अरब राष्ट्रांनी यासंबंधी भारताकडे नाराजी व्यक्त केली आहे. काही राष्ट्रांकडून तर भारताने माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली.

Advertisement

मोहोम्मद पैगंबर (Mohommad Paigambar) यांच्यावरील वादग्रस्त विधानासंबंधीचा वाद ताजा असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये रस्त्यावरील लाखोंचा बघायला मिळतोय. मोहोम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सौदी अरेबिया, इराण, कतार, कुवेत, लिबिया, ओमान, बहारीन, अफगाणिस्तान या देशांमधील लोक एकत्र आले आहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला हाच व्हिडीओ पाकिस्तान स्टुडियो नावाच्या युट्यूब चॅनेलवर बघायला मिळाला. व्हिडीओ 3 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच साधारणतः दीड वर्षांपूर्वी या चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. सहाजिकच या व्हिडिओचा सध्याच्या मोहोम्मद पैगंबर यांच्या संबंधीच्या वादाशी काहीही संबंध नाही, हे येथेच स्पष्ट झाले.

व्हिडिओच्या उर्दू भाषेतील शीर्षकाचा ट्रान्सलेटरच्या मदतीने अनुवाद केला असता हे शीर्षक ‘इमाम खादिम हुसेन रिझवी रहमत-उल-अल्लाह अलैह’ असल्याचे लक्षात आले. या माहितीच्या आधारे किवर्ड सर्च केलं असता शटरस्टॉक या वेबसाईटवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित अनेक फोटोज बघायला मिळाले. वेबसाईटवरील माहितीनुसार सदर फोटोज पाकिस्तानातील लाहोर येथील आहेत.

खादिम हुसेन रिझवी यांच्या प्रार्थनेच्या 40व्या दिवशी लाहोरमधील मुलतान रोडवर मोठा जमाव एकत्र आला होता. खादिम हुसेन रिझवी हे पाकिस्तानातील कट्टर धार्मिक राजकीय पक्ष तेहरीक-ए-लबैकचे संस्थापक होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओचा सध्याच्या मोहोम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादाशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ पाकिस्तानातील लाहोर येथील असून जवळपास दिड वर्षे जुना आहे.

हेही वाचा- उत्तर प्रदेश जामा मशिदीचे घुमट कोसळण्यामागे भगवान महादेवाचा संकेत? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा