Press "Enter" to skip to content

तुमची KBC च्या २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी निवड झाल्याचे मेसेज आल्यास सावधान!

अभिनंदन, तुमचा व्हॉट्सऍप नंबर KBC म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या लकी ड्रॉ मध्ये निवडला गेला आहे. तुम्ही २५ लाख रुपये जिंकले आहात. तुमची रक्कम ताब्यात घेण्यासाठी अमुक अमुक व्हॉट्सऍप नंबरवर संपर्क साधा. असे लिहिलेले मेसेज अनेकांच्या मोबाईलवर येत आहेत. (lucky draw)

काय आहे मेसेज?

HELLO
Namashkar!
I am vijay Kumar from KBC Koun Banega Carorepati mumbai!A
Congratulation, 
Your  wahtsapp  Number  Selected in KBC Sim Card Lucky Draw Compitation 2021!
You have won 25,000,00 Lacs KBC Cash Prize. 

Apka WAHTSAPP Number KBC All india  Sim Card Lucky Draw Compitation Main Winner Bangaya hai!
25,000,00 Lacs KBC Cash Prize Ka!
Please Contact Now KBC Office WhatsApp No:  https://api.whatsapp.com/send?phone=918077961044
KBC Manger:Mr  rana prtabh singh
is Online And get your KBC Prize Money information!
Your Lottery No.0060
Your KBC File No:BT12 

Dear winner please only call to WhatsApp!
Ap abi apne  WhatsApp Number se KBC Office Me Whatsapp Call karein! https://api.whatsapp.com/send?phone=918077961044
Thank you 
Advertisement
Source: whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमृता खंडेराव आणि सचिन जाधव यांना अशाप्रकारचे मेसेज आल्यानंतर ते आमच्या निदर्शनास आणून देत त्यांनी पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सदर मेसेजच्या अनुषंगाने कीवर्ड्सच्या मदतीने गुगल सर्च करून पाहिले. यामध्ये आम्हाला दिल्ली सायबरसेलच्या वेबसाईटवर विस्तृत माहिती मिळाली.

काय आहे हा नेमका प्रकार?

एका अनोळखी क्रमांकावरून आपणास वर नमूद केलेला मेसेज येतो. बऱ्याचदा हा मोबाईल नंबर (+92) या पाकिस्तानच्या कोडने सुरु होणारा असतो. यात तुम्ही KBC किंवा रिलायन्स जिओची लॉटरी (lucky draw) जिंकल्याचे सांगित मेसेज मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते.

जेव्हा तुम्ही त्यांना संपर्क करता तेव्हा तुम्ही जिंकलेल्या रकमेवर क्लेम करण्यासाठीचे काही शुल्क आणि त्यावर भराव्या लागणाऱ्या जीएसटीविषयी ते माहिती देतात. ती रक्कम भरण्यासाठी युपिआय कोड किंवा क्यूआर कोड पाठवला जातो. ऑनलाईन पद्धतीने पैशांची मागणी केली जाते.

त्यानंतर लकी ड्रॉची रक्कम २५ वरून ४५ लाख- ७५ लाख झाली असे सांगत पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली जाते. जोवर समोरची व्यक्ती सांगितलेल्या विविध खात्यांवर रक्कम पाठवत आहे तोवर सतत मागणी वाढत जाते. एकदा समोरची व्यक्ती पैसे पाठवण्यास नकार देऊ लागते तसे सर्व नंबर्सवरून त्या व्यक्तीचा नंबर ब्लॉक केला जातो. तो क्रमांक बंद केला जातो.

फसवणूकीचे मेसेज कसे ओळखावे?

  • ज्या मेसेजसमध्ये तुम्ही लाखो रुपयाचा लकी ड्रॉ जिंकला आहात असे लिहिले असेल
  • मजकुरात वाक्यांची रचना चुकीची असेल, व्याकरणाच्या भरमसाठ चुका असतील
  • ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या रकमेचे, हॉलीदे पॅकेजचे, महागड्या वस्तूचे आमिष दाखवलेले असेल
  • संपर्क साधल्यानंतर तुमची कौटुंबिक, वैयक्तिक माहिती विचारत असतील, बँक डीटेल्स, कार्ड डीटेल्स, पासवर्ड वगैरे विचारत असतील
  • अमुक अमुक रक्कम मिळविण्यासाठी त्यासाठीच्या कराची रक्कम किंवा प्रोसेसिंग फी भरा अशी मागणी होत असेल

तर समजावे की हे सर्व आपल्याला गंडा घालण्यासाठीच चालू आहे.

KBC- कौन बनेगा करोडपतीच्या नावे फसवणूक करणारे मेसेज हे आताचे नाहीत. २०१८ पासून अशा प्रकारच्या मेसेजेसमधून जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार चालू आहेत. यावर एका नागरिकाने ट्विट केले असता मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यास सावधानतेच ईशारा देत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये KBC म्हणजेच अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांना पाठवण्यात येत असलेले लकी ड्रॉ (lucky draw) जिंकल्याचे मेसेज फेक असून आर्थिक फसवणुकीसाठीचे सापळे असल्याचे निष्पन्न झाले. अशा मेसेजेसपासून सावध रहा!

हेही वाचा: स्टेटस ठेऊन रोजचे ५०० रुपये कमावण्याच्या लोभाने ‘त्या’ लिंकवर क्लिक करण्याआधी हे वाचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा