Press "Enter" to skip to content

सिंगापूरने कोरोना मृतांचे पोस्टमॉर्टेम करून सत्य बाहेर आणल्याचे दावे करणारे मेसेज फेक!

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमावलीविरुद्ध जात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे शवविच्छेदन केले (Postmortem of corona dead body) आणि सगळा बनाव उघडा पडला. असे दावे करणारे लांबलचक मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.

Advertisement
Source: facebook

फेसबुक व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेले हे मेसेज या आधी रशिया आणि इटलीच्या नावे व्हायरल होत होते. केवळ देशाचे नाव बदलले जात आहे उर्वरित मजकूर जवळपास आहे असाच कॉपी पेस्ट केला जातोय.

Russia is the first country to do autopsy on the covid19 death body claims are fake checkpost marathi fact.jpg

व्हायरल दाव्यातील ठळक मुद्दे:

 • रशिया/सिंगापूर हा कोविड -१९ पेशंटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
 • रशिया/सिंगापूर मधील तज्ञ डॉक्टरांनी ‘डब्ल्यूएचओ’ प्रोटोकॉल पाळला नाही आणि कोविड -१९ पेशंटच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले
 • कोविड -१९ हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही तर मानवी मृत्यूस कारणीभूत ठरणारा एक बॅक्टेरियम आहे.
 • कोविड -१९ हा रोग रक्त गोठण्यासाठी कारणीभूत ठरणारा एक आजार आहे, मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे लोक मरतात.
 • रशिया/सिंगापूरने रूग्णांना 100 मिलीग्राम अ‍ॅस्पिरिन आणि इम्रोमॅक घेणे सुरू केले याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांचे आरोग्य सुधारू लागले.
 • वैज्ञानिक शोधाच्या काही काळानंतर, रशिया/सिंगापूरमधील डॉक्टरांनी हा रोग ‘जागतिक युक्ती’ असल्याचे सांगितले.
 • या पोस्टचा स्रोत ‘ रशियन आरोग्य मंत्रालय, रशिया’/ ‘सिंगापूर आरोग्य मंत्रालय’ असे लिहिलेले आहे.

सदर दावे खूप मोठ्या प्रमाणात ‘फेसबुक‘ आणि व्हॉट्सऍपवर व्हायरल होत आहेत.

Russia postmortem covid deaths viral posts on Facebook
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण फडणीस, विष्णू मुंजाळे, संजय सोनटक्के, अनिल कचरे, निसार अली आणि दिग्विजय डुबल यांनी व्हायरल मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यातील एकेका मुद्द्याची पडताळणी करून पाहिली. जे समोर आलं ते पुढीलप्रमाणे-

 • रशिया/सिंगापूर हा कोविड -१९ पेशंटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem of corona dead body) करणारा जगातील पहिला देश असल्याचे सांगितले आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत अमेरिका, जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांनीही कोरोना मृताचे शवविच्छेदन केले आहे.
 • रशिया/सिंगापूरने WHOचा प्रोटोकॉल डावलून सत्य शोधण्यासाठी कोरोना मृताचे शवविच्छेदन (Postmortem of corona dead body) केल्याचे या मेसेजमध्ये लिहिले आहे. परंतु WHOने पोस्टमोर्टेमवर बंदी असल्याचे नियम लावलेच नाहीत. उलट सुरक्षितपणे शवविच्छेदन कसे करावे याच्या गाईडलाईन्स सप्टेंबर २०२० मध्येच जारी केल्या आहेत.
 • रशिया/सिंगापूरच्या संशोधनात कोविड -१९ हा विषाणू नसून मृत्यूस कारणीभूत ठरणारा एक बॅक्टेरियम आहे असा उल्लेख मेसेजमध्ये आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर कोरोनाचा उल्लेख ‘SARS-CoV-2 virus’ असा स्पष्टपणे करण्यात आलाय. त्यामुळे त्यांनी कोव्हीड१९ बॅक्टेरियामुळे होत असल्याचा उल्लेख निराधार आहे.
 • व्हायरल दाव्यातील ही बाब काही अंशी खरी आहे की कोविड -१९ हा रोग रक्त गोठण्यासाठी कारणीभूत ठरणारा एक आजार आहे, मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे लोक मरतात. कोरोना विषाणूच्या इतर काही परिणामांपैकी रक्ताच्या गाठी होणे हे एक परिमाण शरीरासाठी जास्त घातक आहे. याविषयी अनेक तज्ज्ञांनी संशोधन करून उपाय सुचवले आहेत.
 • रशिया/सिंगापूरने रूग्णांना 100 मिलीग्राम अ‍ॅस्पिरिन आणि इम्रोमॅक सारखी Antibiotics दिल्या म्हणून त्यांच्यात सुधारणा झाली या दाव्यात तथ्य नाही. रुग्णालयात भरती झाल्यानंतर इतर बॅक्टेरीयांचा शरीरावर हल्ला होऊ नये म्हणून अँटीबायोटीक दिल्या जातात. त्यांचा कोरोना विषाणूवर थेट फरक पडत नाही, असे WHOने स्पष्ट केलेले आहे. दाहविरोधी आणि रक्त पातळ होण्याच्या औषधी यांचा योग्य मेळच कोव्हीड१९वर लाभदायी ठरू शकतो.
Are antibiotics effective in preventing and treating the new coronavirus?
 • वैज्ञानिक शोधाच्या काही काळानंतर, रशिया/सिंगापूरमधील डॉक्टरांनी हा रोग ‘जागतिक युक्ती’ असल्याचे सांगितले. याचा स्रोत रशियन//सिंगापूर आरोग्य मंत्रालय असल्याचे दाव्यात लिहिले आहे.
 • परंतु रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर असा कसलाही उल्लेख नाही. याउलट रशियाने स्वतः तयार केलेल्या २ लशी तेथील नागरिकांसाठी दिल्या जात आहेत. तसेच भारतासह इतर देशांतही निर्यात केल्या आहेत.
 • सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने हे व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारे कोव्हीड मृताचे शवविच्छेदन करून मिळालेल्या माहितीनुसार उपचारांत बदल केल्याच्या दावे निराधार असल्याचे सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे चुकीचे आणि अवैज्ञानिक असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे निराधार दावे करून सामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे.

यासारख्या विविध दाव्यांची ‘चेकपोस्ट मराठी’ने वेळोवेळी पुराव्यानिशी पोलखोल केली आहे. खालील लिंकवर क्लीक करून आपण ते तपासू शकता:

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा