Press "Enter" to skip to content

काश्मीरमध्ये खातमा केलेल्या अतिरेक्याचा म्हणून माध्यमांनी वापरला ISIS दहशतवाद्याचा फोटो!

काश्मीरमध्ये ७ जुलै रोजी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई (Mehrajuddin Halwai) उर्फ उबैदला ठार करण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली.

Advertisement

काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मेहराजुद्दीन हलवाई (Mehrajuddin Halwai) हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक होता. या कारवाईची बातमी देताना अनेक माध्यमांनी आणि पत्रकारांनी देखील एक फोटो वापरलाय. हा फोटो मेहराजुद्दीन हलवाईचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Swarajy Patrika and Money Control used ISIS terrorist's photo to show kashmiri terrorist meharajuddin check post marathi fact
Source: Swarajya / Patrika / Money Control

दिल्ली भाजपचे प्रमुख अजय सेहरावात यांनी देखील फोटो पोस्टसह कारवाईची माहिती दिलीये.

अर्काइव्ह

पडताळणी:

फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता बीबीसीच्या वेबसाईटवर १७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. बातमीनुसार फोटोतील व्यक्ती आयसिस दहशतवादी उमर हुसेन (Omar Hussein) आहे.

Source: BBC

बातमीनुसार उमर हुसेन हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जिहाद’चा प्रचार आणि प्रसार करायचा. हुसेन आयसिस अर्थात ‘इस्लामिक स्टेट’चा कट्टर समर्थक होता. इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यासाठी निवडण्यात आलेल्या ७०० जणांमध्ये त्याचा समावेश होता.

रिपोर्टनुसार हुसेन सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी तयारी राहण्याची हाक दिली होती. आयसिसमध्ये भरती होण्यापूर्वी हुसेन मॉरिसन या ब्रिटीश सुपरमार्केटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असे.

टाईम्स ऑफ इजराईल आणि इंडिपेंडन्टच्या बातम्यांमधील उमर हुसेनच्या दुसऱ्या फोटोंवरून त्याची व्हायरल फोटोतील ओळख पटवली जाऊ शकते.

‘बीबीसी’च्या रिपोर्टनुसार सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात हुसेन मृत्यूमुखी पडल्याचे मानण्यात आले आहे. तर ‘द सन’च्या रिपोर्टनुसार हुसेनने सीरियामध्ये एक आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.अमेरिकी वेबसाईट एक्स्प्रेसच्या बातमीनुसार उमर हुसेनला ४९ दिवस बंदिवासात ठेवल्यानंतर सीरियामध्ये ठार मारण्यात आले.

वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये हुसेनच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या बातम्या बघायला मिळतात. त्यामुळे त्याविषयी खात्रीलायक काहीही सांगता येत नाही. मेहराजुद्दीन हलवाईचा म्हणून वापरण्यात आलेला फोटो उमर हुसेनचा आहे, एवढं मात्र नक्की.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अनेक महत्वाच्या माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याच्या मृत्यूची बातमी देताना जो फोटो वापरलाय, तो फोटो हराजुद्दीन हलवाईचा नसून आयसिसशी संबंधित दहशतवादी उमर हुसेनचा आहे.

हेही वाचा- न्याय मागायला गेलेल्या हिंदू मुलीला पाकिस्तानमध्ये वकिलांनीच लाथा बुक्क्यांनी मारले? वाचा सत्य!

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा