Press "Enter" to skip to content

नोव्हेंबर मध्ये कोरोनाचा कहर म्हणत ICMRच्या दाखल्याने मीडियात चुकीच्या बातम्या

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची मोठी लाट येईल असा अंदाज ICMRने वर्तवला असल्याचं सांगत अनेक माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत.

‘जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज’ अशा हेडलाईनखाली लोकमतने आज १५ जून २०२० रोजी बातमी

Advertisement
प्रसिद्ध केलीय.

‘India to witness COVID-19 peak in mid-November, says ICMR study’ ही आहे ‘द हिंदू’ची बातमी

‘भारत में Coronavirus महामारी नवंबर में अपने चरम पर होगी, कम पड़ेंगे ICU, वेंटिलेटर: स्टडी’ असं म्हणत नवभारत टाईम्स ने बातमी दिली.

असाच दावा असणारी बातमी अमरउजालाने सुद्धा दिलीय: ‘लॉकडाउन ने 83 फीसदी कम किया खतरा, नवंबर में चरम पर पहुंचेगा कोरोना संक्रमण’

पडताळणी:

कोरोना व्हायरसच्या नावाने प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या पद्धतीने धास्ती बसलेली आहे. नोकरी, व्यवसाय आणि आयुष्यच सगळंच एकंदरीत धोक्यात असताना या अशा बातम्या पसरणे म्हणजे भीतीचे वातावरण निर्माण नाही होणार तरच नवल.

म्हणूनच ‘चेकपोस्ट मराठी’ने ICMRने नेमका काय स्टडी केलाय, क्काय आहेत त्यांचे दावे हे व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आधी ICMRची वेबसाईट आणि मग अधिकृत ट्विटर हँडलवर या रिपोर्ट बाबत काही आहे का हे तपासून पाहिलं.

… आणि आश्चर्य म्हणजे ICMRने बातमीच शेअर करत दाव्यांना झिडकारून लावलंय. असा कुठलाही स्टडी ICMRने केलेला नसून या रिपोर्टमधील मतांना आम्ही दुजोरा देत नाही आहोत असेही त्यात म्हटलंय.

यात त्यांनी रिपोर्ट बाबत बोलताना non-peer reviewed अशी संज्ञा वापरली आहे. non-peer reviewed म्हणजे कुठल्याही वैज्ञानिक अभ्यासाशिवाय, अधिकृत संशोधनाशिवाय केलेले अंदाजित दावे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये हे स्पष्ट झालं की भारतात कोरोना विषाणू विरोधात मोहीम उभी करताना ज्या संस्थच्या नियमावलीचा आधार घेतला जातोय त्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ म्हणजेच ICMRने बातम्यांतून आलेल्या दाव्यांचे खंडण केले आहे.

द हिंदू, लोकमत, नवभारत टाईम्स, अमर उजाला यांसारख्या नामांकित वर्तमानपत्रात ‘नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा उत्पात वाढणार. औद्योगिक सामुग्री कमी पडणार’ असे जे दावे केले आहेत ते ICMRच्या स्टडीचे नसून, ज्यांनी कुणी केले आहेत त्यांना सुद्धा ICMR दुजोरा देत नाही.’

त्यामुळे अशा कुठल्याही खाजगी अवैज्ञानिक दाव्यांच्या आधारे समोर आलेल्या बातम्या जनतेत विनाकारण भीती वाढवू शकतात. अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना ‘चेकपोस्ट’वरच अडवत आहोत.

हेही वाचा: आयसीएमआर रिपोर्ट येण्यापूर्वीच मिडीयाने बरे केले ३०% कोरोना रुग्ण !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा