Press "Enter" to skip to content

लहान मुलाला दोरीने सपासप मारणाऱ्या ‘त्या’ माणसाच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

सोशल मीडियात २.१४ मिनिटाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये एक व्यक्ती लहानग्या मुलास एका महिलेसमोर दोरीने सपासप मारत आहे. ती महिला या दृश्याचा राक्षसी आनंद घेतेय. कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला संताप आणेल असा हा व्हिडीओ आहे. (man thrashing kid by roap)

Advertisement

‘कृपाकरून न कंटाळा करता ह्या हरामखोर माणसाचा हा व्हिडीओ. इतका फाॅरवड करा की हा (24)तासात पोलीस ताब्यात गेलाच पाहिजे. 🙏🏻प्लिज. 🙏🏻हि दया त्या लहानशा बालका साठी करा.’ अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ व्हायरल करण्याचे आवाहन केले जातेय.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील गिरकर आणि तानाजी कांबळे यांनी व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने (man thrashing kid by roap) व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्यानंतर काही बातम्या आम्हाला सापडल्या.

तेलंगणा टुडे‘च्या बातमीनुसार व्हिडीओत दिसणारे छोटे बाळ मुलगा नसून तीन वर्षीय मुलगी आहे. तेलंगणामधील मेदक पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. मादीसेट्टी नागाराजू असे व्हिडीओतील इसमाचे नाव असून समोर बसलेली महिला त्याची बायको सुनयना आहे.

Telangana Today news screenshot about man beating his own daughter viral video
Source: Telangana Today

द ट्रिब्युन इंडिया‘च्या बातमीनुसार मादीसेट्टी हा मेडक नगरपालिकेत ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. त्याने पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले परंतु पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचा ताबा स्वतःकडे घेतला. यामुळे दुसरी पत्नी नाराज झाली. तीला आनंद मिळावा म्हणून तो मुलीला सतत मारत असे. व्हिडीओतही आपण पाहू शकतो की त्या स्त्रीला मुलीच्या बापाने मारल्यानंतर अनाद होतोय आणि हसू येते आहे.

हे वारंवार होत असताना त्यांच्या शेजारच्यांनी हस्तक्षेप करत मादीसेट्टीला समजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याने तुमचा संबंध नसल्याचे सांगत त्यांच्यावरच अरेरावी केली. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ त्याच शेजाऱ्याने लपून छपून शूट केलाय.

मेदक पोलिसांनी व्हायरल व्हिडीओआधीच मादीसेट्टीला समजवले होते परंतु आता खूप मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली आहे. सध्या मादीसेट्टी फरार आहे. तेलंगणाच्या महिला विकास व बाल कल्याण विभागाने छोट्या मुलीला स्वतःकडे घेतले असून तिच्या खऱ्या आईकडे तिचा ताबा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. (man thrashing kid by roap)

हेही वाचा: लेकराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारणाऱ्या महिलेच्या व्हायरल व्हिडीओजचे सत्य आले समोर

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा