Press "Enter" to skip to content

रशियामधील ट्रेनवर भगवान श्रीकृष्णाचे फोटो? वाचा व्हायरल फोटोचे सत्य!

रशियामधील ट्रेनच्या इंजिनवर इस्कॉनच्या उपासकांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा छापून घेतली आहे. हेच भारतात घडलं असतं तर संसदेपासून देशभरात सेक्युलर लोकांनी गदारोळ माजवला असता. अशा अर्थाच्या कॅप्शनसह ट्रेनचा एक फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement
No photo description available.
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शशिकांत कोचीकर आणि सुनील सुतार यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणीस सुरुवात करत असताना असे लक्षात आले की हे दावे 2019 सालापासून व्हायरल होत आहेत.

व्हायरल ईमेज यांडेक्स सर्च इंजिनवर रिव्हर्स सर्च केली असता ‘Southern States Group‘ या वेबसाईटने अपलोड केलेला फोटो आम्हाला सापडला.

हा फोटो आणि व्हायरल ईमेज तंतोतंत जुळणारी आहे. ट्रेनमागील झाड, विजेचा खांब, ट्रेनवरील ‘108M’ नंबर आणि फोटोचा अँगल सर्वच एकसारखे आहे.

सदर मेट्रो ट्रेन रशियाची नसून ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील आहे. तसेच यावर कुठेही कृष्णाच्या प्रतिमा नाहीत. व्हायरल फोटोत एडिटिंगच्या साहाय्याने कृष्णाचे फोटोज जोडण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की रशियाच्या ट्रेन इंजिनवर इस्कॉनने भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा छापून घेतल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल फोटो एडीट केलेला आहे. यामध्ये असणारी मेट्रो ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील आहे.

हेही वाचा: कृष्णाच्या पायाला स्पर्श होताच वाटीतील पाणी गळून कसे जाते? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

a magical pot with shri krushna idol is just an example of science and engineering checkpost marathi fact

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा