Press "Enter" to skip to content

दूरदर्शनचे वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या मृत्यूची बातमी खरी की खोटी? वाचा सत्य!

दूरदर्शनचे वृत्तनिवेदक, संयत परंतु भारदस्त आवाज असणारे प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांचे निधन झाले. मुख्य प्रवाहातील बहुतेक माध्यमांमध्ये याविषयीच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. सोशल मीडियावर मात्र काही पोस्ट्स अशाही पहायला मिळतायेत ज्यांत भिडे यांच्या कुटुंबियांकडून सदर बातमी चुकीची असल्याचे सांगण्यात आले असून बातमी लावणाऱ्या न्यूज वेबसाईटने माफीही मागितल्याचे दावे केले जातायेत.

Advertisement

व्हायरल पोस्टचा मजकूर:

संबंधित वेबसाईटकडून मिळालेली दिलगिरी -(*प्रसिद्ध वृत्त निवेदक श्री प्रदीप भिडे याच्या संदर्भात फिरणारी ती बातमी खोटी*आज अचानक सोशल मीडिया वर प्रसिद्ध वृत्त निवेदक श्री प्रदीप भिडे यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध झाली.या संदर्भात श्री प्रदीप भिडे यांच्या कुटुंबियांशी शी वेबन्युजवाला ने संपर्क केलाअसताही केवळ अफवा असुन श्री प्रदीप भिडे यांची प्रकृती एकदम व्यवस्थित असुन या सर्व बातम्या चुकीच्या असल्याची माहिती त्यांची पुतणी वैभवी भिडे यांनी दिली.या बातमी संदर्भात वेबन्युज च्या नावाने एक पोस्ट सोशल मीडिया वर फिरताना आढळुन आली. मात्र अशी पोस्ट केवळ अनावधाने केली गेली असु शकते.या संदर्भात श्री प्रदीप भिडे यांच्या कुटूंबियांना झालेल्या मनस्तपाबद्दल वेबन्युजवाला परिवार दिलगीर आहे.तसेच श्री प्रदीप भिडे यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आपला नम्रकौस्तुभ दरवेस)****- वैभवी दिलीप भिडे, पुणे

Source: Facebook

ही पोस्ट अनेकांच्या फेसबुक वॉलवर पहायला मिळतेय.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्टमधील मजकूर व्यवस्थित वाचला असता सदर दाव्यांचा स्रोत प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांची पुतणी वैभवी भिडे असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे लक्षात आले की २०२० साली ‘वेबन्यूजवाला’ या वेबसाईटने प्रदीप भिडे यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर वैभवी भिडे यांनी सदर वेबसाईटला खडसावत त्यंनी दिलेल्या चुकीच्या बातमीविषयी जाहीर माफीनाम देण्यास भाग पाडले होते. याविषयी माहिती देणारी पोस्ट त्यांनी स्वतः १६ जुलै २०२० रोजी फेसबुकवर शेअर केली होती.

Source: Facebook

७ जून रोजी प्रदीप भिडे यांच्या मृत्यूची बातम्या आल्यानंतर अनेकांनी हळहळ करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावरून शेअर केल्या. त्यात काहींनी वर व्हायरल होणारी पोस्ट कमेंट करत बातमी फेक असल्याचे दावे केले. यावर पुन्हा एकदा भिडे यांची पुतणी वैभवी यांनी नवी पोस्ट लिहून स्पष्टीकरण देत व्हायरल पोस्ट जुनी असून आताची मृत्यूची बातमी खरे असण्याला दुजोरा दिला.

Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या मृत्यूची बातमी फेक असण्याचे सांगणाऱ्या व्हायरल पोस्ट्स चुकीच्या आहेत. २०२० साली एका न्यूज वेबसाईटने प्रसिद्ध केलेली बातमी चुकीची होती. त्यासंबंधीची ती प्रदीप भिडे यांची पुतणी वैभवी भिडे यांची ती पोस्ट होती. परंतु आता नव्याने आलेल्या बातम्या खऱ्या असून प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे असे स्वतः वैभवी यांनीच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अटॅक आल्याचे दर्शवणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज सोबतचा दावा चुकीचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा