Press "Enter" to skip to content

राज्याचा विकास दाखविण्यासाठी योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये कोलकात्याच्या उड्डाणपुलाचा फोटो!

इंग्रजी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या आजच्या अंकातील पहिल्या पानावर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी ‘जाहिरात’ प्रकाशित करण्यात आली आहे.

‘ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ’ अशा शीर्षकाखाली प्रकाशित या जाहिरातीत उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरी संदर्भातील अनेक दावे करण्यात आले आहेत. आदित्यनाथ यांच्या नेतृतखालील बदलत्या उत्तर प्रदेशचं विकसित रुपडं दाखविण्यासाठी जाहिरातीत एका उड्डाणपुलाचा फोटो वापरण्यात आलाय.

Advertisement

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या जाहिरातीतील उड्डाणपुलाचा फोटो कोलकात्यातील ‘माँ’ उड्डाणपुलाचा (Maa Flyover) असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक स्वतंत्र पत्रकार तसेच विरोधी पक्षातील नेत्यांकडून यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांच्यावर पश्चिम बंगालचा ‘विकास’ चोरल्याची बोचरी टीका केली जात असल्याचे बघायला मिळतेय.

अलामी या फोटो स्टॉक वेबसाईटवर ‘माँ’ उड्डाणपुलाचे (Maa Flyover) अनेक फोटोज उपलब्ध आहेत. एक्स्प्रेसच्या जाहिरातील फोटो देखील या वेबसाईटवर बघायला मिळतोय.

Source: Alamy

‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित बातमीमध्ये कोलकात्यातील ‘माँ’ उड्डाणपुलाचा फोटो बघायला मिळतोय. हा फोटो आणि योगी सरकारच्या जाहिरातीमधील फोटो सारखाच असल्याचे लक्षात येतेय.

Source: The Times of India

योगी सरकारच्या जाहिरातीत उड्डाणपुलाच्या पाठीमागे दोन इमारती बघायला मिळताहेत. या इमारती म्हणजे कोलकात्यातील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल होय. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिलीये. मोईत्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये उड्डाणपुलावरून धावणाऱ्या आणि खास कोलकात्याची ओळख असणाऱ्या पिवळ्या टॅक्सीचा देखील उल्लेख केलाय.

दरम्यान, ‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात एक ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. वृत्तपत्राच्या मार्केटिंग टीमकडून उत्तर प्रदेश संबंधीच्या जाहिरातीत चुकीचा फोटो वापरण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला आम्ही दिलगीर असून वृत्तपत्राच्या सर्व डिजिटल आवृत्तीतून ही जाहिरात हटविण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण एक्सप्रेसकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा- योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा