Press "Enter" to skip to content

अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नमाज पढले सांगणाऱ्या भाजप समर्थकांच्या पोस्ट्स फेक!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जामा मस्जिद येथे नमाज पढले सांगणाऱ्या दाव्यांसह एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. (kejriwal namaz 2021)

Advertisement

‘बड़ी खब़र: साल के पहले दिन जामा मस्जिद जाकर दिल्ली के मालिक जनाब भो श्री अरविंद केजरीवाल ने पढ़ी नमाज़ देश और दिल्ली के लिये पढ़ी दुआ।’ या अशा कॅप्शन सह एक फोटो पोस्ट केला जातोय. फोटोमध्ये केजरीवाल गोल टोपी, पंचा परिधान करून दुवा मागत असल्याच्या हावभावात दिसत आहेत.

‘खून मे देश भक्ति है | श्री राम भक्त | नेशनलिस्ट | मोदी योगी समर्थक | चमचो से नफरत | केवल देश भक्त जुड़े | देश द्रोही दूर रहे l’ असे स्वतःच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये लिहिलेल्या ट्विटर युजर प्रिया सिंह (TAF) यांनीही सदर दावा करत ट्विट केले आहे.

अर्काइव्ह लिंक

‘भक्तो की टोली-नरेंद्र मोदी’ या फेसबुक पेजवरूनही (kejriwal namaz 2021) सदर फोटो त्याच कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलाय.

बड़ी खब़र: साल के पहले दिन जामा मस्जिद जाकर दिल्ली के मालिक जनाब भो श्री अरविंद केजरीवाल ने पढ़ी नमाज़ देश और दिल्ली के लिये पढ़ी दुआ ।

Posted by भक्तो की टोली – नरेन्द्र मोदी on Friday, 1 January 2021

अर्काईव्ह लिंक

‘राष्ट्रवादी हिंदू ,,गर्वित सघ स्वयसेवक ,हिंदू तन मन, हिंदू जीवन, रंग – रंग हिंदू मेरा परिचय,’ असे स्वतःबद्दल परिचय लिहिलेल्या रवी गुरु या फेसबुक युजरनेसुद्धा असाच दावा करणारी पोस्ट केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीची सुरुवात करताना सर्वात आधी व्हायरल फोटोस गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिले. आमच्यासमोर ७ जुलै २०१६ रोजीची ‘जनसत्ता‘ची बातमी आली.

या बातमीनुसार सदर फोटो त्याच दिवशी आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. तेव्हाही या फोटोवरून केजरीवालांना अनेक मुस्लीमद्वेष्ट्या लोकांनी ट्रोल केले होते.

याच बातमीचा आधार घेत आम्ही सदर फोटो ‘आप’च्या कोणत्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलाय हे तपासण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ७ जुलै २०१६ रोजीच ‘आप पंजाब’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो पोस्ट केल्याचे लक्षात आले. यावर पंजाबीमध्ये ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोन्ही लिंक्सवर नेमकेपणाने अरविंद केजरीवाल यांचा हा फोटो कुठला आहे यावर काहीही माहिती नाही म्हणून आम्ही अधिक सखोल गुगल सर्च केले असता ‘HTDC’ कंटेंट सर्व्हिस या वेबसाईटवर काहीशी विस्तृत माहिती सापडली. यानुसार पतियाळाच्या संगरुर मधील मलेरकोटला येथे रमजान महिन्यात करण्यात येणाऱ्या रोजाच्या उपवासांना सोडण्यासाठी मुस्लीम समुदायासोबत केजरीवाल सामील झाले होते. हा फोटो ४ जुलै २०१६ रोजी काढलेला आहे.

HTDC screenshot about kejriwal namaaz
Source: HTDC

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (kejriwal namaz 2021) व्हायरल पोस्टमधील दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. अरविंद केजरीवाल यांचा हा फोटो नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे १ जानेवारी २०२१चा जामा मशिदीतील नसून जवळपास साडेचार वर्ष जुना ४ जुलै २०१६ रोजी पतियाळामध्ये काढलेला आहे.

हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा