ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. आता खऱ्या अर्थाने राम मंदिर उभे राहण्यास सुरुवात होणार त्यामुळे कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांना त्यांच्या कथित वक्तव्यावरून ट्रोल केले जात आहे.
‘५ अगस्त को आत्महत्या कर सकते है कपिल सिब्बल कहा था राम मंदिर निर्माण शुरू हुआ तो आत्महत्या कर लुंगा’ अशी वाक्ये लिहून तयार केलेले मीम्स व्हायरल होतायेत.
‘सावधान ५ अगस्त को आत्महत्या कर सकते है कपिल सिब्बल’ असे लिहून काहींनी ग्राफिक बनवलंय आणि ते सर्वत्र पोस्ट करतायेत.
‘पुन्हा नरेंद्र ,पुन्हा देवेंद्र एक कोटी समर्थक प्रत्येकाने १०० मित्र जोडा.’ नावाच्या फेसबुक ग्रुपवर
‘राम मंदिर बना तो मै आत्महत्या कर लूँगा – कपिल सिब्बल
जो वादा किया वो निभाना पड़ेगा
रोके ज़माना चाहे रोके खुदाई
तुमको जाना पड़ेगा! अशी पोस्ट टाकण्यात आली आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचे मूळ वक्तव्य नेमके काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
विविध कीवर्ड्स वापरून सर्च केले तरीही कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर निर्माण व्हायला चालू झाले तर मी आत्महत्या करेल’ अशा आशयाचे कुठेही वक्तव्य सापडले नाही. ना कुठल्या न्यूज पेपरमध्ये ना न्यूज चॅनलवर. त्यानंतर आम्ही ट्विटरवर त्यांनी असे काही म्हंटले आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केला पण तिथेही त्यांचे असे काही वक्तव्य सापडले नाही.
‘जब तक जिंदा हूँ, नही बनने दूंगा राम मंदिर : कपिल सिब्बल, काँग्रेस’ असे हेडलाईन असणारी एक बातमी आमच्या सर्च मध्ये आली पण ती बातमी कुणा न्यूज किंवा पेपरमध्ये ना न्यूज चॅनलची नव्हती तर ती ‘योगी आदित्यनाथ की सेना’या पोर्टलची होती.
गंमत म्हणजे या बातमीतही हेडलाईनमध्ये दिलेल्या वाक्याचा संपूर्ण बातमीत कुठे उल्लेखही नाहीये.
अयोध्या निकालावर कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी नेमके काय मत व्यक्त केले होते हे आम्ही सर्च केले आणि आम्हाला TV9 भारतवर्षच्या बातमीची लिंक मिळाली ज्यात स्वतः कपिल सिब्बल बोलत आहेत. यात त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या भूमिकेला अनुसरून निकालाचे स्वागत केले आहे. ते असेही म्हणाले की, ‘हा मुद्दा इथे संपलाय आता देशाच्या ईतर महत्वाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे.’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर निर्माण चालू झाले तर आत्महत्या करेल’ अशा अर्थाचे वक्तव्य कधी केलेच नाहीये.
याउलट त्यांनी अयोध्या निकालाचे स्वागत करत हा निकाल देशाच्या एकतेला पूरक असल्याचेच म्हंटले आहे.
हेही वाचा: राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातील रस्ता म्हणत व्हायरल होतोय खड्डेयुक्त बिहारचा रस्ता!
[…] हेही वाचा: कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर बनले तर आ… […]
[…] हेही वाचा: कपिल सिब्बल यांनी ‘राम मंदिर बनले तर आ… […]