Press "Enter" to skip to content

हिंदू धर्मियांची माथी भडकाविण्यासाठी पत्रकार दीपक चौरसियांनी वापरला पाच वर्षांपूर्वीच्या पेंटिंगचा संदर्भ!

‘न्यूज नेशन’ या हिंदी न्यूज चॅनेलचे अँकर दीपक चौरसिया यांनी काल ट्विटरवर एक पोस्ट टाकलीय. त्यात चौरसियांनी दावा केलाय की आसामच्या अकरम हुसैन नामक पेंटरने गुवाहाटी येथील रवींद्र भवन आर्ट गैलरी मध्ये भगवान श्रीकृष्णाची वादग्रस्त पेंटिंग (akaram hussain painting) बनवलीय.

या घटनेला चौरसियांनी बंगळुरू हिंसेच्या घटनेशी जोडलंय. एवढं निंदनीय कृत्य करणारी व्यक्ती क्षमेस पात्र नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. चौरासिया यांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होतंय. बातमी लिहीत असेपर्यंत हे ट्विट साधारणतः ८६०० वेळा रिट्विट केलं गेलंय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

अनेक युजर्स ट्विटर तसेच फेसबुकवर हाच कॉपी पेस्ट दावा प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर करताहेत. फेसबुकवर चौरसियांच्या नावे ग्राफिक देखील शेअर शेअर केलं जातंय.

viral message screenshot
Source: Whatsapp
deepak chaurasia graphical post
Source: Facebook

इस्कॉनकडून या प्रकरणात अकरम हुसैन विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

साध्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळू शकते. आम्ही गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने व्हायरल पेंटिंग शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला ‘वन इंडिया’ या न्यूज वेबसाईटवर १४ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचायला मिळाली.

News screen shot to tell FIR launched against painter in 2015
Source: One India

भगवान श्रीकृष्ण आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आसाममधील कलाकाराविरोधात एफआयआर नोंदविण्यात आल्याचे या बातमीत सांगण्यात आले आहे. २०१५ साली रवींद्र भवन येथे आयोजित प्रदर्शनात हे पेंटिंग (akaram hussain painting) ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यावरून वाद व्हायला लागल्यानंतर ते प्रदर्शनातून हटविण्यात आल्याचं देखील बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

याच संदर्भातील दै. भास्करचं ११ एप्रिल २०१५ रोजीचं ट्विट देखील बघायला मिळालं. ज्यात पेंटर अकरम हुसैन विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.

अनेक ट्विटर युजर्सनी आसाम पोलिसांकडे अकरम हुसैनवर कारवाई करण्याची मागणी केल्याने गुवाहाटी पोलिसांनी देखील यासंदर्भात ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. गुवाहाटी पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हे प्रकरण २०१५ सालचे असून पोलिसांनी ३० मे २०१५ रोजीच अकरम हुसैनला अटक केली होती. शिवाय वादग्रस्त पेंटिंग (akaram hussain painting) जप्त करण्यात आले होते.

वस्तुस्थिती :

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ५ वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढून ते आताचे म्हणून सांगण्याचा खोडसाळपणा पत्रकार दीपक चौरसिया यांनी केला आहे. या प्रकरणाला बंगळुरू हिंसेशी जोडून दीपक चौरासिया हिंदू धर्मियांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

संबंधित प्रकरणाचा बंगळुरू हिंसेशी काहीही संबंध नाही. शिवाय संबंधित प्रकरणी आरोपीस ५ वर्षांपूर्वीच अटक देखील करण्यात आल्याचे गुवाहाटी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केरळातील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी दीपक चौरसिया यांनी अशाच प्रकारे फेक माहितीच्या आधारे ट्विट केले होते.

हे ही वाचा- केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अटक झाली; पण अमजद अली, तमीम शेख यांना नाही !

More from राजकारणMore posts in राजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा