अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ‘जो बायडन’ यांचे अभिनंदन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यास रिप्लाय देत जो बायडन यांनी ‘ धन्यवाद विश्वनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असे उद्गार काढल्याचे ट्विट (joe biden tweet on modi) सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.
‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षचा पदभार स्वीकारलेल्या जो बायडन यांचे अभिनंदन. त्यांच्यासोबत काम करून भारत अमेरिकेतील संबंध दृढ होण्यासाठी पुरेपूर प्रयत्नरत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे’ अशा अर्थाचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यास उत्तर देताना बायडन यांनी मोदींना ‘ World Leader’ म्हणजेच ‘विश्वनेता’ संबोधल्याचे ट्विट केले (joe biden tweet on modi) असल्याचे दावे करत स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी व्हायरल स्क्रिनशॉट व्यवस्थित निरखून पाहिला.
दोन्ही हँडल्स वेगवेगळे:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जो बायडन’ यांचे अभिनंदन करण्यासाठी ज्या हँडलला टॅग केले आहे त्याचा आयडी आहे ‘@JoeBiden’ आणि मोदींना ज्यावरून रिप्लाय दिला गेलाय तो आयडी आहे ‘@JoeBidenPresid’. या तफावतीमुळे शंकेची पाल चुकचुकली आणि आम्ही सखोल पडताळणीचा प्रयत्न केला.
फेक अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई:
‘जो बायडन’ यांच्या नावे तयार झालेल्या विविध फेक अकाऊंट्सवर ट्विटरने कारवाई करत ते अकाऊंट्स सस्पेंड केले आहेत. त्यात हे ‘@JoeBidenPresid’ ज्यावरून व्हायरल स्क्रिनशॉटचा जन्म झालाय. ते सुद्धा बंद करण्यात आले आहे. असेच दुसरे ‘@JoeBidenPres’ असेही एक हँडल बंद केले आहे.
खरे हँडल कोणते?
कोणत्याही सेलिब्रिटीचे किंवा मोठ्या नेत्याचे अधिकृत अकाऊंट कोणते हे ओळखण्याच्या साध्या गोष्टी म्हणजे त्यावर ‘ब्ल्यू टिक’ आहे का ते पहावे. ट्विटर स्वतःच्या पद्धतीने विश्वासार्हता पडताळून अशा अकाऊंट्सला व्हेरीफाय करून ब्लू टिक देते. तसेच त्या हँडलच्या निर्मितीस किती वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यास किती लोक फॉलो करत आहेत यावरून देखील सहज अंदाज बांधता येतो.
‘ब्ल्यू टीक’ म्हणजेच ट्विटर ने व्हेरीफाय केलेले, २००७ साली म्हणजे तब्बल १३ वर्षे जुने असलेले आणि २६ मिलियनपेक्षा जास्त फोलोवार्स असणारे ‘@JoeBiden’ हे हँडल अधिकृत आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ‘विश्व नेता’ असे कधी म्हणालेच नाहीत. ज्या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय ते ट्विटर हँडल फेक आहे.
हे ही वाचा: ‘जो बायडन’ यांनी व्हाईट हाउसमध्ये प्रवेश करताना हिंदू मंत्राचे पठन करून घेतले?
[…] […]
[…] […]