Press "Enter" to skip to content

‘गुलाम’ फिल्ममधील कलाकार जावेद हैदर उपजीविकेसाठी भाजीपाला विकत असल्याच्या बातम्या फेक!

आमीर खानचा ‘गुलाम’ चित्रपटातील सहकलाकार जावेद हैदर (javed hyder) उपजीविकेसाठी भाजीपाला विकत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

Advertisement

जर आपणास आठवत असेल तर गुलाम चित्रपट चालू झाल्यावर कोर्टातील सीननंतर घरी गेल्यावर मित्रांच्या चौकडीसमोर कोर्टात वकील बाईनी कसे मेलोड्रॅमॅटीक डायलॉग मारून सिद्धुला म्हणजे आमीरला सोडवलं हे नकला करून सांगणारा मित्र म्हणजे जावेद हैदर.

‘बिग बॉस’ फेम डॉली बिंद्रा हिने सर्वात आधी २५ जून रोजी ट्वीटर अकाऊंटवरून ‘तो कलाकार आहे आणि आज तो भाजीपाला विकतोय जावेद हैदर’ अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट केला.

डॉली बिंद्राने पोस्ट केलेला हा व्हिडीओ २२० युजर्सनी रिट्वीट केलाय. सोशल मिडीयावर व्हायरल होत चाललेल्या याच व्हिडीओच्या आधारे ‘रिपब्लिक वर्ल्ड’, ‘झी न्यूज’, ‘हिंदुस्तान टाईम्स’ आणि ‘न्यूज १८’ने बातम्या देखील प्रसिद्ध केल्यात.

सगळ्या बातम्यांचा सूर जवळपास हाच आहे की ‘गुलाम’मधील आमीर खानचा सहकलाकार जावेद हैदर (javed hyder) उपजीविकेसाठी संघर्ष करतोय. सोशल मिडीयावर काही जणांनी त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त केलीये, तर  अनेकांनी युजर्सनी त्याच्या लढवय्येपणाचं कौतुक केलंय.

पडताळणी:

आम्ही सोशल मिडीयावर व्हायरल होत चाललेल्या व्हिडीओच्या पडताळणीसाठी गुगलवर कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केलं, त्यावेळी आम्हाला ‘बॉलीवूडबबल’चा एक रिपोर्ट मिळाला.

बॉलीवूडबबल’च्या या रिपोर्टनुसार जावेद हैदर सय्यद आर्थिक तंगीमुळे उपजीविकेसाठी भाजीपाला विकत नसून सध्याच्या काळात नैराश्याच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना धीर देण्यासाठी, लढण्याचा मेसेज बनविण्यासाठी हा व्हिडीओ बनविण्यात आला होता.

‘बॉलीवूडबबल’शी बोलताना जावेद हैदर सय्यद यांनी जे सांगितलंय ते त्यांच्याच शब्दात,

“मी भाजीवाला नाहीये. टीकटॉकवर नवीन काही तरी घेऊन यायचं होतं, कारण मी नुकतंच टीकटॉक जॉईन केलंय. सध्या जी देशाची परिस्थिती आहे, लोक आत्महत्या करताहेत, चोरी करताहेत, ते सगळं करू नये. धीर न सोडता, मेहनत करावी हाच मेसेज व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचायचा होता.”

bollywoodbubble news about Jave Hyder news
Source: Bollywoodbubble

जावेदने पुढे असंही सांगितलं की डॉली बिंद्राच्या फेसबुक वालवर आपण भाजी विकत नसून मेसेज देण्यासाठी व्हिडिओ बनवला असल्याचं लिहिलंय. पण तिच्याकडून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही.

भविष्यात आर्थिक तंगीची परिस्थिती निर्माण झालीच तर आपल्याला भाजी विकायला बिलकुल लाज वाटणार नाही, असंही ते स्पष्ट करतात. त्यासाठी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं उदाहरण देतात. जर देशाचे पंतप्रधान चहा विकू शकतात तर आपण का नाही, असा प्रतिप्रश्न ते विचारतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला जावेद हैदर सय्यद यांचा भाजी विकतानाचा व्हिडीओ खरा असला तरी त्यासोबत केले जाणारे दावे खोटे आहेत.

जावेद हैदर सय्यद आर्थिक तंगीमुळे उपजीविकेसाठी भाजीपाला विकत नाहीत. व्हिडीओ बनविण्यामागे लोकांना सकारात्मक राहण्याचा आणि धीर खचू न देता मेहनत करण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे.  

हे ही वाचा- ‘पिठाच्या पिशव्यांमध्ये १५००० रुपये वाटणारा दानशूर व्यक्ती आमीर खान नाही’

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा