Press "Enter" to skip to content

इजराईलने लढाऊ विमानाला भारतीय महिला सौम्या संतोषचे नाव दिलेले नाही, व्हायरल फोटो एडिटेड!

इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षात 11 मे रोजी भारतीय नागरिक सौम्या संतोष यांचा मृत्यू झाला. सौम्या इजराईलमधील अश्‍केलोन येथे नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह कालच दिल्लीत आणण्यात आला. या घटनेनंतर सोशल मीडियावर एका लढाऊ विमानाचा फोटो शेअर केला जात आहे. या विमानावर ‘सौम्या’ असं लिहिलेलं (saumya santosh fighter jet) बघायला मिळतंय.

सोशल मीडियावर दावा केला जातोय की इजराईलने आपल्या लढाऊ विमानाला सौम्या संतोष यांचं नाव दिलं असून याच विमानाने पॅलेस्टाईनच्या लष्करप्रमुखांवर हल्ला करण्यात आला. इजराईलने पॅलेस्टाईनला अशा प्रकारे अद्दल घडवून सौम्या यांना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली आहे.     

Advertisement

हिंदू युवा वाहिनीशी संबंधित योगी देवनाथ यांनी ट्विटरवर अपलोड केलेला हा फोटो बातमी करेपर्यंत 2300 पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आला होता. 

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा फोटो याच कॉपीपेस्ट दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला कोरा वेबसाईटवर लिन शियी या चिनी युजरने दि. 2 एप्रिल 2020 रोजी सध्या व्हायरल होत असलेला फोटो अपलोड केला असल्याचे आढळून आले.

शियी यांच्या पोस्टनुसार फोटोत दिसणारे लढाऊ विमान J-10 C आहे.

Source: Quora

दोन्ही फोटो व्यवस्थितरीत्या बघितले असता आपल्या अगदी सहजपणे लक्षात येईल की मूळ विमानावर ‘सौम्या’ हे नाव बघायला मिळत नाही. म्हणजेच व्हायरल फोटोत ‘सौम्या’ हे नाव (saumya santosh fighter jet) एडिट करण्यात आलं असल्याचं स्पष्ट होतं.

JET comparison for SOUMYA checkpost marathi fact check

त्यानंतर आम्ही J-10 C विषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार चीन हा J-10 C या विमानाचा उत्पादक देश असुन चीनच्या वायुसेनेसाठी चेंगडू विमान उद्योग समूहाने या विमानाची निर्मिती केली आहे. विमानाच्या नावातील C देखील चेंगडूशीच संबंधित आहे. विमानाची निर्मिती सर्वप्रथम २००२ साली करण्यात आली असून २००६ या वर्षांपासून हे विमान चीनच्या वायुसेनेच्या सेवेत आहे.

इजराईलपॅलेस्टाईन संघर्षात भारत कुणाच्या बाजूने?

इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षात भारतीय सोशल मीडिया दोन्ही बाजूंनी विभागला गेला असल्याचं बघायला मिळतंय. सत्ताधारी भाजपशी संबंधित अनेक नेत्यांनी आणि उजव्या विचारधारेच्या संघटनांनी या प्रश्वावर इजराईलचे समर्थन केले आहे.    

अर्काइव्ह

भारताने अधिकृतरीत्या मात्र पॅलेस्टाइनला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षावर भारताचे प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना पॅलेस्टाइनला पाठिंबा जाहीर केला आहे. पॅलेस्टाइनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर जुन्या फोटोच्या आधारे चुकीचे दावे केले जाताहेत. इजराईलने आपल्या लढाऊ विमानाला भारतीय महिला सौम्या संतोषचे नाव दिलेले नाही. शिवाय व्हायरल फोटोत दिसणारे लढाऊ विमान इजराईलचे नसून चीनच्या वायुसेनेच्या सेवेतील आहे.

हे ही वाचा- इजराईलच्या पंतप्रधानांनी भारताविषयी ‘हे’ वक्तव्य केलेलं नाही, व्हायरल स्क्रिनशॉट फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा