Press "Enter" to skip to content

व्हॉट्सऍपवरील शुभेच्छा संदेशाच्या ईमेजेस डाऊनलोड केल्यास चोरीला जाऊ शकतात बँक डीटेल्स? वाचा सत्य!

व्हॉट्सऍपवर फॉरवर्ड होऊन आलेले शुभेच्छा संदेश, ‘गुड मॉर्निंग’ ईमेजेस-व्हिडीओज जर आपण डाउनलोड केले तर चायनीज हॅकर्स आपले बँक डीटेल्स चोरू शकतात (whatsapp good morning messages virus). त्यामुळे अशा सर्व ईमेजेस तत्काळ डिलीट करण्याचे आवाहन करणारे मेसेज, पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

Advertisement

चायनीज हॅकर्स अशा शुभेच्छांच्या ईमेजेसद्वारे ‘फिशिंग’ करून आपला मोबाईल हॅक करताहेत. या संबंधी माहिती देणारी बातमी ‘शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूज’ने प्रकाशित केली असल्याचे व्हायरल दाव्यात म्हंटले आहे. हे दावे केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल होताहेत.

Good Morning pics are china's trogen for phishing

अर्काइव्ह लिंक

सदर दावे असणारा भलामोठा मेसेज व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होतोय.

May be an image of text

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे, प्रकाशभाऊ जगताप आणि भालचंद्र जोहारी यांनी याविषयी माहिती देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात करताना ऍडव्हान्स कीवर्ड्सचा वापर करून गुगल सर्च केले. परंतु संबंधित दाव्यांविषयी फारसे कुठे अधिकृत माहिती मिळाली नाही.

  • दाव्यात उल्लेख केलेल्या ‘शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूज‘ बद्दल सर्च केले.परंतु अशा नावाचा कुठला न्यूज पेपर किंवा चॅनलच अस्तित्वात नाही. तसेच यामध्ये ओल्गा निकोलावेना नामक वकिलाने सतर्कतेचा इशारा दिलाय असाही उल्लेख आहे. परंतु अशा नावाची कुणी व्यक्ती अस्तित्वात नाही.
  • अटलांटाच्या एक महिला वकील आहेत. त्यांचे नाव ‘मिस. ओल्गा निकोलावेना गम्बिनी’ असे असल्याचे गुगल सर्च मध्ये सापडले परंतु त्यांनी व्हॉट्सऍपच्या गुडमोर्निंग ईमेजेस बद्दल (whatsapp good morning messages virus) काही वक्तव्य केल्याचे कुठे आढळत नाही.
  • एका दाव्यात व्हॉट्सऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीजच्या बातमीचा आधार घेत सदर गुड मॉर्निंग ईमेजेस कसे आपले डिटेल्स चोरतील असा दावा केलाय. परंतु आम्ही जेव्हा या नव्या पॉलिसीजबाबत अधिक माहिती घेतली तेव्हा हे दोन्ही मुद्दे अगदीच वेगळे असल्याचे दिसले.
  • नव्या पॉलिसीजनुसार व्हॉट्सऍपची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला आपल्या व्हॉट्सऍप वापरावर मर्यादित अर्थाने ऍक्सेस मिळत आहे. म्हणजेच आपल्या व्हॉट्सऍप वापरानुसार फेसबुकवर कशा प्रकारच्या जाहिराती दाखवायला हव्यात याचे निर्णय घेतले जातील. या नव्या पॉलिसीजमुळे आपले मेसेज फेसबुककडे जातील, स्टोअर होतील असा अर्थ नाही. नव्या पॉलिसीज नुसार कम्पणीने आपली काही खाजगी माहिती फेसबुक इन्स्टाग्राम या समूहातीलच कंपन्यांना तसेच तिऱ्हाईत कँपन्यांना पुरवण्याचा हक्क घेतला आहे. याविषयी बीबीसी मराठीने सविस्तर माहिती दिलीय. परंतु या अशा काही नव्या बदलांनी व्हायरल दाव्यांना कुठेही पुष्टी मिळत नाही.
  • भारताची ‘कॉम्पुटर इमर्जन्सी रीस्पॉन्स टीम‘ नामक संस्था आहे. याद्वारे सायबर सुरेक्षेशी संबंधित काही धोका असल्यास जनहितार्थ सूचना दिल्या जातात. यांच्या अधिकृत वेबसाईट किंवा ट्विटर हँडलवरही व्हायरल डाव्यांशी संबंधित काहीही सतर्कतेचा इशारा नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत तरी या अशा ईमेजेसच्या सहाय्याने बँक डीटेल्स घेऊन चोरी केल्याची घटना कुठे घडल्याचे आढळले नाही, परंतु हे असे घडण्याची भविष्यात शक्यता नाही असे छातीठोकपणे म्हणणेसुद्धा चुकीचे ठरेल.

ईमेजेस किंवा व्हिडीओज द्वारे एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल, कम्प्युटरवर मालवेअर पाठवणे शक्य आहे. त्यास ‘डिजिटल स्टेगनोग्राफी‘ असे म्हणतात. त्यामुळे अनोळखी, संशयास्पद क्रमांकावरून आलेल्या ईमेजेस, व्हिडीओज किंवा लिंक्स ओपन करताना, डाऊनलोड करताना सतर्कता बाळगायला हवी.

हेही वाचा: मोबाईल हरवल्यास पोलिसांकडे जायची गरज नाही, एका मेलने मिळणार फोन?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा