Press "Enter" to skip to content

निवडणूक अधिकाऱ्यानेच दिली बिहार निवडणूकीत घोटाळ्याची कबुली?

सोशल मीडियावर एका महिलेचा साधारणतः अडीच मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ही महिला निवडणुकीतील गैरव्यवहाराविषयी, मतमोजणी कक्षातील अनागोंदी कारभाराविषयी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त करतेय. दावा केला जातोय की ही महिला निवडणूक अधिकारी असून ती बिहार निवडणुकीतील महाघोटाळ्याची कबूली (polling officer admitting rigging) देत आहे.

Advertisement

#बिहार_विधानसभा इलेक्शन मध्ये झालेला महाघोटाळा निवडणूक अधिकारी मिडीया समोर मांडत आहेत. उरण मतदार संघात सुद्धा असा प्रकार घडला सारखा वाटत आहे. #जाहीर_निषेध

Posted by Prashant Patil on Wednesday, 18 November 2020

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

कथितरित्या बिहार विधानसभा निवडणुकीतील गैरव्यवहाराची कबूली (polling officer admitting rigging) देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याचा म्हणून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.

आम्हाला मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असल्याचे आढळून आले. व्हिडीओच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील सांवेर येथील आहे. सांवेर विधानसभा मतदार संघातील मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणात गडबड झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.

या ट्विटवरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे व्हिडीओ बिहारमधील नसून मध्य प्रदेशातील सांवेर येथील आहे. दुसरं असं की ट्विटच्या कॅप्शनमध्ये कुठेही व्हिडिओतील महिला निवडणूक अधिकारी असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.

संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थितरित्या बघितल्यास त्यात सुदर्शन गुप्ता आणि राजेश सोनकर यांच्या नावाचा उल्लेख मिळतो. त्याआधारे गुगल सर्च केलं असता हे दोघेही मध्य प्रदेश भाजप मधील नेते असल्याची माहिती मिळाली. सुदर्शन गुप्ता इंदौरमध्ये तर राजेश सोनकर सांवेरमध्ये सक्रिय असतात.

राजेश सोनकर यांनी २०१८ सालची विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

या माहितीच्या आधारे सांवेरमध्ये निवडणुकीत गैरव्यवहाराचा काही प्रकार घडला होता का, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘ANI’च्या वेबसाईटवर एक बातमी मिळाली. या बातमीनुसार सांवेरमध्ये विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार प्रेमचंद गुड्डू यांचा मुलगा अजित बोरासी यांनी ईव्हीएम सील तोडण्यात आल्याचे आरोप केले होते.

बातमीमध्ये रश्मी बोरासी यांचा देखील उल्लेख आहे. त्या काँग्रेसचे उमेदवार प्रेमचंद गुड्डू यांची मुलगी असल्याचं सांगण्यात आलंय. बातमीत रश्मी यांची प्रतिक्रिया देखील आहे. रश्मी यांची बातमीतील प्रतिक्रिया आणि व्हिडिओतील आरोप जवळपास सारखेच आहेत. ही गोष्ट व्हिडिओतील महिला रश्मी असल्याचे सुचवते.

व्हिडिओतील महिला रश्मीच आहेत का हे याची खातरजमा करण्यासाठी आम्ही परत एकदा गुगल सर्चचा आधार घेतला असता आम्हाला दै. भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमीत रश्मी बोरासी यांचा फोटो मिळाला. या फोटोवरून व्हायरल व्हिडिओतील महिला आणि फोटोतील महिला एकच असून त्या काँग्रेसचे सांवेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रेमचंद गुड्डू यांची मुलगी रश्मी बोरासी असल्याचं स्पष्ट झालं. 

Source: Bhaskar

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाशी काहीही संबंध नाही.

शिवाय ईव्हीएम गडबडीचा आरोप करणारी महिला निवडणूक अधिकारी नसून मध्य प्रदेशातील सांवेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार प्रेमचंद गुड्डू यांची मुलगी रश्मी बोरासी आहेत.

हे ही वाचा- बटण हत्ती समोरचे दाबले तरी मत कमळाला जातेय? बिहार निवडणुकीत EVM घोटाळा?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा