Press "Enter" to skip to content

रणवीर, दीपिका आणि संदीप सिंग सोबतच्या फोटोत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या निर्माता संदीप सिंगचं नाव चर्चेत आहे. याच संदीप सिंगचा रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासोबतच्या पार्टीतला फोटो व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की फोटोत या सगळ्यांसोबत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (ranveer deepika and dawood) देखील आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी संदीप सिंगचं दुबई कनेक्शन असल्याचं सांगितल्यापासून संदीप सिंग संशयाच्या भोवऱ्यात आहे. फोटोत संदीप सिंगच्या बाजूला बसलेली लाल सर्कलमधील व्यक्ती दाऊद इब्राहिम असल्याचा दावा करण्यात येतोय.

Advertisement
fB post to claim there is Dawood with Deepika and Ranveer Checkpost marathi
Source: Facebook

ह्याच फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट ट्विटरवर देखील शेअर करण्यात येतोय.

पडताळणी:

फोटोत रणवीर आणि दीपिका सोबत दिसणारी व्यक्ती खरंच दाऊद इब्राहिम (ranveer deepika and dawood) आहे का हे तपासण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला पिंकविला या सिनेक्षेत्राशी निगडित वेबसाईटची २०१३ सालची बातमी मिळाली.

बातमीनुसार फोटो रणवीर आणि दीपिकाच्या ‘गोलियो की रास लीला राम लीला’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा आहे. फोटोत ‘राम लीला’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी देखील दिसताहेत.

असं असलं तरी या बातमीत फोटोतील संदीप सिंग सोबत दिसणारी दाऊद इब्राहिमच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असणारी व्यक्ती कोण याची माहिती मात्र नाही.

त्यानंतर आम्हाला प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर वासीक खान यांचं एक ट्विट मिळालं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की फोटोत दिसणारी व्यक्ती आपण आहोत आणि आपलं नाव दाऊद इब्राहिम नाही.

त्यानंतर आम्ही ‘राम लीला’च्या प्रोडक्शन डिझायनरविषयी सर्च केलं त्यावेळी चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर वासीक खान हेच असल्याचे स्पष्ट झाले. दाऊद इब्राहिम आणि वासीक खान यांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी सारखेपणा आहे.

wasiq khan vs dawood comparison checkpost marathi

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत रणवीर,दीपिका आणि संदीप सिंग यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नाही.

फोटो २०१३ सालचा असून ‘गोलियो की रास लीला राम लीला’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा आहे. जी व्यक्ती दाऊद इब्राहिम असल्याचा दावा केला जातोय, ती व्यक्ती प्रोडक्शन डिझायनर-आर्ट डिरेक्टर वासीक खान आहेत. ‘राम लीला’चे प्रोडक्शन डिझायनर देखील तेच होते.

हे ही वाचा- अमीर खानला हिंदूविरोधी ठरवण्यासाठी सोशल मीडियात फेकन्युजला ऊत! वाचा पोलखोल!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा