Press "Enter" to skip to content

मतदारांना पैसे वाटताना तेजस्वी यादव कॅमेऱ्यात कैद?

बिहार निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांचा साधारणतः मिनिटभराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तेजस्वी यादव लोकांना पैसे वाटताना (tejaswi yadav distributing money) दिसताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यानचा असून तेजस्वी यादव खुलेआम मतदारांना पैसे वाटत फिरताहेत.

Advertisement

भाजपच्या पंजाब सोशल मीडिया सेलचे माजी प्रमुख वरुण पुरी यांनी आपल्या व्हेरीफाईड अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केलाय. बिहारमध्ये नोकऱ्या वाटप करताना तेजस्वी यादव असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिलंय. बातमी लिहीपर्यंत ९२६ युजर्सकडून ही पोस्ट रिट्विट केली गेलीये.

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय. निवडणूक आयोगाच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच देशात लोकशाही व्यवस्था आहे की नाही असा सवाल देखील केला जातोय. तसेच लोकशाही व्यवस्था असल्यास तेजस्वी यादव यांच्या अटकेची मागणी केली जातेय. 

तेजस्वी यादव खुलेआम चुनावी सभा में पैसे अपने हाथ से बांट रहा है निर्वाचन आयोग खामोश है आखिर इस देश में लोकतंत्र नाम की चीज है या नही अगर है तो इसको जेल में होना चाहिए…..🙏🙏🙏

Posted by सुधांशु सिंह राजपूत on Friday, 30 October 2020

पडताळणी:

व्हिडीओच्या सत्यतेची खातरजमा करण्यासाठी आम्ही काही किवर्डसह गुगल सर्च केलं. तेव्हा आम्हाला १७ ऑगस्ट २०२० रोजी ‘बाढ़ पीड़ितों के बीच तेजस्वी यादव ने बांटे पैसे, VIDEO वायरल’ या हेडलाईनसह प्रकाशित बातमी मिळाली.

बातमीनुसार व्हिडीओ छपरा येथील आहे. बिहारमध्ये आलेल्या पुरात छपरामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. बिहार विधानसभेत विरोधी पक्ष नेते असलेले तेजस्वी यादव नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते.

नुकसानीच्या पाहणीसाठी गेलेल्या तेजस्वी यादव यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जमलेल्या महिलांना आर्थिक मदत केली होती. जवळपास ५० पेक्षा अधिक महिलांना तेजस्वी यांनी आर्थिक मदतीचे वितरण केले होते. त्यावेळी देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

यापूर्वी छपरा मतदारसंघाचे खासदार लालू प्रसाद यादव देखील मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक गोरगरिबांन आशाच पद्धतीने आर्थिक मदत करत असत. यामुळे लालू यादव यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघनाचे आरोप देखील झालेले आहेत. दरम्यान तेजस्वी यादव यांनी पैशाचं वितरण केलं त्यावेळी मात्र बिहारमध्ये आचारसंहिता लागू नव्हती, असे देखील या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या संदर्भात व्हायरल होणारा व्हिडीओ (tejaswi yadav distributing money) चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. तेजस्वी यादव पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत असतानाचा व्हिडीओ मतदानासाठी पैसे वाटतानाचा म्हणून व्हायरल केला जातोय.  

हे ही वाचा- बटण हत्ती समोरचे दाबले तरी मत कमळाला जातेय? बिहार निवडणुकीत EVM घोटाळा?

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा