सोशल मीडियावर एका शिवलिंगाचा (Shivalinga) व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये शिवलिंगावर जलाभिषेक होत असल्याचे बघायला मिळतेय. दावा करण्यात येतोय की हे शिवलिंग तामिळनाडूमधील तारा राजमार्गावर (Tara Highway Tamilnadu) असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्षाचे 365 दिवस फक्त या शिवलिंगावरच पाऊस पडतो.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यासह व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता युट्यूबवर 19 मार्च 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओसोबतच्या शीर्षकामध्ये हा व्हिडीओ मलेशियातील कारक मार्गावरील शिव मंदिराचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे किवर्डसच्या साहाय्याने अधिक शोध घेतला असता सदर शिवलिंगाबद्दल माहिती देणारे अनेक व्हिडीओज बघायला मिळाले. या व्हिडीओजमध्ये हे मलेशियातील शिव मंदिर असल्याचे सांगण्यात आले आहे. हे मंदिर मलेशियातील सेलनागर (Selangor) येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या शिवलिंगावर वर्षातील बाराही महिने पाऊस पडत असल्याची माहिती मात्र कुठेही वाचायला मिळाली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याप्रमाणे शिवलिंग तामिळनाडूमधील नाही, तर मलेशियातील आहे. शिवाय या शिवलिंगावर वर्षातील बाराही महिने पाऊस पडत असल्याचे दावे देखील निराधार आहेत.
हेही वाचा- ज्ञानवापी मशिद- शिवलिंग संदर्भात फेकन्यूजचा सूळसुळाट! वाचा महत्वाच्या व्हायरल दाव्यांचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment