fbpx Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?

कृषी कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि केंद्र शासन एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं चित्र आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याविरोधात देखील एल्गार पुकारण्यात आलाय. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत नरेंद्र मोदी एका महिलेला झुकून अभिवादन करताना दिसताहेत. नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी (narendra modi bowing to adani’s wife) प्रीती अदानी असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

इन्हें किसानोके सामने झुकना चाहिए नाकी अदानी के रानी के सामने

Posted by Rajesh Humane on Tuesday, 15 December 2020

अर्काइव्ह पोस्ट

काहीसा असाच दावा ट्विटरवर देखील केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना झुकून अभिवादन करताहेत त्या खरंच उद्योगपती गौतम अदानींच्या पत्नी (narendra modi bowing to adani’s wife) आहेत का हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ‘वन इंडिया’ पोर्टलवर एक बातमी मिळाली. या बातमीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिसणाऱ्या महिलेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘वन इंडिया’च्या बातमीनुसार फोटोत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दिसणारी महिला म्हणजे दीपिका मोंडल. दीपिका दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दीपिका 2003 पासून त्या संस्थेत कार्यरत आहे.सध्या व्हायरल होत असलेला फोटो 2015 मधील आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

‘दिव्य मराठी’ने देखील यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनुसार दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्थेचे प्रमुख कार्य संस्कृती, शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, आदिवासींचा विकास यासंबंधीचे आहे. या एनजीओचे काम दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चालते. त्यांचा मुख्य उद्देश भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.

आम्ही गौतम अदानींच्या पत्नी प्रीती अदानी यांच्या इंटरनेटवरील उपलब्ध फोटोशी व्हायरल फोटोची तुलना केली. त्यात दीपिका मोंडल आणि प्रीती अदानी यांच्यातील फरक स्पष्टपणे दिसून येतोय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोचा आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नीचा काहीही संबंध नाही. व्हायरल फोटोत नरेंद्र मोदी यांच्यासह दिसणाऱ्या दीपिका मोंडल आहेत. त्या दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

हे ही वाचा- भाजप कार्यकर्त्याने शेतकरी आंदोलनात घुसून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या का?

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा