Press "Enter" to skip to content

भीमा कोरेगावच्या युद्धात लढलेल्या महार सैनिकाचे हे दुर्मिळ छायाचित्र नाही! मग कुणाचे?

भीमा कोरेगावमध्ये ‘पेशवे विरुद्ध ब्रिटीश’ असे जे युद्ध (bhima koregaon battle) झाले होते त्यात ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या एका महार सैनिकाचे दुर्मिळ छायाचित्र म्हणत २०१७ सालापासून एक फोटो व्हायरल होतोय.

Advertisement

‘पेशवे विरुद्ध इस्ट इंडिया कंपनी’ या १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धात ब्रिटिशांकडून केवळ ८०० सैनिक आणि पेशव्यांचे २००० सैनिक अशी लढाई तब्बल १२ तास सुरु होती. सरतेशेवटी पेशवा सैनिकांनी माघार घेत पलायन केले. ब्रिटीश सैनिकांच्या तुकडीत बहुतांश महार समाजाचे सैनिक होते. त्यांच्या शौर्यानेच हे शक्य झाले.

याच यशोगाथेची आठवण म्हणून ब्रिटिशांनी विजय स्तंभ उभारला. या युद्धाला दलित चळवळीच्या नजरेत अनन्यसाधारण महत्व आहे. यातीलच एका शूर सैनिकाचा दुर्मिळ फोटो असल्याचे सांगत गेल्या काही वर्षांपासून पोस्ट्स व्हायरल होतायेत.

१ जानेवारी, १८१८ भीमा-कोरेगावच्या युद्धातील एका महार सैनिकाचे दुर्मिळ छायाचित्र. तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीचे सल्लागार…

Posted by Sadashiv Kambale on Friday, 23 November 2018

येत्या १ जानेवारीस या युद्धास १०३ वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे आता हा फोटो व्हॉट्सऍपवर सुद्धा व्हायरल होत आहे. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दीपक गांगुर्डे यांनी पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटोस गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिले. त्यातून अनेक लिंक्स समोर आल्या, पैकी सर्वांची माहिती एकसारखीच होती. विश्वासार्ह स्रोत म्हणून आम्ही ब्रिटानिकाच्या वेबसाईटवरील माहिती जाणून घेतली.

हा फोटो नेमका कुणाचा?

या व्यक्तीचे नाव आहे ‘केटश्वायो’. १८७२ ते ७९च्या काळात तो दक्षिण आफ्रिकेतील झुलू देशाचा तो राजा होता. ४० हजार शिस्तबद्ध सैनिकांचा तो शक्तिशाली म्होरक्या होता. ब्रिटिशांना आपले साम्राज्य वाढवायचे होते, या वेळी त्यांनी अति आत्मविश्वासात झुलूवर हल्ला केला आणि मोठी जिव्हारी लागेल अशी हार पत्करावी लागली. कालांतराने कुटनीतीने त्यांनी ‘केटश्वायो’ला हरवले आणि बंदी बनवले होते.

ब्रिटीश एम्पायर या वेबसाईटवर ‘केटश्वायो’चे आणखी एक प्रसिद्ध छायाचित्र उपलब्ध आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये पेशवे विरुद्ध ब्रिटीश लढाईत (bhima koregaon battle) लढलेल्या महार सैनिकाचे दुर्मिळ छायाचित्र म्हणून व्हायरल होणारा फोटो दक्षिण आफ्रिकेतील झुलू देशाचा राजा ‘केटश्वायो’चा असल्याचे स्पष्ट झाले.

कोरेगाव भीमाचे युद्ध १८१८ साली लढले गेले होते. सदर फोटोतील व्यक्तीचा राजा म्हणून कार्यकाळ १८७२ ते ७९ असा आहे. एकुणातच दोन्ही बाबींचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही.

हेही वाचा: कोर्टाने जातीवरून शिवीगाळ प्रकरणात ऐट्रोसिटी अंतर्गत तक्रार करता येणार नसल्याचा आदेश दिलाय?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा