Press "Enter" to skip to content

शहीद भगतसिंग यांना चाबकाचे फटके दिले जात असतानाचा हा फोटो आहे का?

सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये एका व्यक्तीला चाबकाचे फटके देण्यात येत असल्याचे दिसतेय. फोटो शेअर करताना दावा केला जातोय की फोटोत शहीद भगतसिंग (Bhagat Singh) असून त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्याकडून चाबकाने मारण्यात येत आहे.

Advertisement

“आज़ादी के लिए कोड़े खाते भगत सिंह जी की तस्वीर उस समय के अखबार में छपी थी ताकि और कोई भगत सिंह ना बने हिन्दुस्थान में..क्या गांधी-नेहरू की ऐसी कोई तस्वीर है आपके पास? फिर कैसे मान लूं कि चरखे ने आजादी दिलाई ??” अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.

Source: Twitter

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला किम वॅग्नर यांच्या ट्विटमध्ये हा फोटो मिळाला. वॅग्नर यांच्या ट्विटर बायोनुसार वॅग्नर लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ट्विटच्या कॅप्शमध्ये त्यांनी म्हंटलंय,

“पंजाबच्या कसूर येथे सार्वजनिकरित्या सजा देण्यात आल्याचे हे दोन फोटोज आहेत. बेंजामिन हॉर्मन यांनी 1920 मध्ये हे फोटो प्रकाशित केले होते.”

Source: Twitter

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला. आम्हाला बेंजामिन हॉर्मन यांच्या ‘अमृतसर एंड अवर ड्यूटी टू इंडिया’ या पुस्तकाच्या अर्काइव्हमध्ये हा फोटो बघायला मिळाला. फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “भारतातील आणखी एक फोटो, ज्यामध्ये कसूर रेल्वे स्थानकावर एका माणसाला चाबकाचे फटके मारण्यात येत आहे.”

फोटोच्या कॅप्शनमध्ये कुठेही भगतसिंग यांच्या नावाचा उल्लेख नाही.

‘सबरंग’ वेबसाईटवर प्रकाशित लेखात देखील आम्हाला हा फोटो बघायला मिळाला. जालियनवाला बाग हत्याकांडाला (Jalian wala bhag massacre) १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. फोटोला ‘१९१९ मध्ये पंजाबमध्ये सार्वजनिकरित्या देण्यात येणारी सजा’ असे कॅप्शन देण्यात आले होते.

Source: Sabrang

१९१९ साली भगतसिंग केवळ १२ वर्षांचे होते. भगतसिंगांच्या संपूर्ण चरित्रात १९१९ साली वयाच्या १२ व्या वर्षी त्यांना अशा प्रकारची सजा झाल्याचा कुठलाही उल्लेख नाही. सहाजिकच या फोटोशी भगतसिंग यांचा काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर १९१९ सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित फोटो भगतसिंगांच्या नावाने शेअर केला जात आहे. मात्र या फोटोशी भगतसिंग यांचा काहीही संबंध नसून व्हायरल दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा- काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा