Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अशा पद्धतीने मारहाण केलीय?

काल ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर दोन फोटोजचा कोलाज असणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत एका व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचं दिसतंय. दावा केला जातोय की फोटोत दिसणारी व्यक्ती अर्णब गोस्वामी असून महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना मारहाण (arnab goswami tortured) करण्यात येतेय. 

Advertisement

भाजपचे प्रवक्ते गौरव गोयल यांनी हा फोटो ट्विट केलाय. हे अर्णब गोस्वामी असल्यावर विश्वासच बसत नाही. हे जर खरंच असेल तर महाराष्ट्र सरकार शेवटची घटका मोजत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी देखील केलीये. साधारणतः ३१०० युजर्सकडून हे ट्विट रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह पोस्ट

सोशल मीडियावर इतरही अनेकांकडून हा फोटो शेअर केला जातोय.

पडताळणी:

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही तो फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला ‘न्यूज १८’च्या वेबसाईटवर १० जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली.

बातमीनुसार व्हायरल फोटो उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात पोलिसांकडून कथितरित्या मोबाईल चोरीच्या प्रकरणातील आरोपीला करण्यात आलेल्या मारहाणीचा हा फोटो आहे. इतक्या वाईट पद्धतीने मारहाण केल्या संबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

आम्हाला न्यूज प्लॅटफॉर्मच्या युट्यूब चॅनेलवर या मारहाणीचा व्हायरल व्हिडीओ देखील बघायला मिळाला. त्यानुसार देखील हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील देवरिया येथील असल्याचं स्पष्ट होतंय.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी काल २०१८ सालातल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक केली. या अटकेनंतर प्रदीप पाटील, सचिन वाझे आणि इतर सात पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा अर्णब गोस्वामींनी केला होता. त्याबाबतीतला पुरावा म्हणून त्यांनी आपल्या हातावरचा ओरखडा दाखवला होता.

न्यायालयाने मात्र व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले. गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश अलिबागच्या सत्र न्यायालयाने दिले होते. या तपासणीनंतर गोस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळच्या सुनावणीदरम्यान प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे (arnab goswami tortured) दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने गोस्वामींची तक्रार फेटाळून लावली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर अर्णब गोस्वामींना महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा म्हणून व्हायरल केल्या जात असलेल्या फोटोचा अर्णब गोस्वामींच्या अटकेशी काही एक संबंध नाही. हा फोटो उत्तर प्रदेशातील देवरिया येथील स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलिसांकडून मोबाईल चोरीच्या प्रकरणातील आरोपीला करण्यात आलेल्या मारहाणीचा आहे.

हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘मोदी-मोदी’चे नारे?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा