Press "Enter" to skip to content

सांगलीतील विट्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय? जाणून घ्या सत्य!

सोशल मीडियावर त्यातही प्रामुख्याने व्हाट्सअपवर एक ऑडिओ क्लिप आणि त्यासोबत एका आरोपीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. साधारणतः १ मिनिट ३६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आलाय की सांगली जिल्ह्यातील विट्यामध्ये लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय (child kidnapping gang) झाली आहे.

Advertisement

व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये दावा करण्यात आलाय की विट्यामध्ये दोन फासे पारध्यांना अटक केली असून, त्यांनी कबूल केले आहे की, ते एक दोन तीन नसून चक्क तीन हजार आहेत. मध्य प्रदेश आणि गडचिरोली या भागातून ते आले आहेत.

Source: Whatsapp

तालुक्यातील सर्व गावांमध्ये फासेपारधी चोरांनी धुमाकूळ घातला असून ते लहान मुलांना पळवून नेतात. आजूबाजुच्या गावात चोऱ्यांचे, लुटमारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असेही व्हिडिओत म्हंटलंय. सोबतच काही खबरदारीच्या सूचनांसह सर्व मित्रांना कसल्याही परिस्थितीत मेसेज पोहोचविण्याचे आवाहन देखील करण्यात आलंय.

पडताळणी:

व्हायरल ऑडिओ क्लीपची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘7 स्टार न्यूज’ या स्थानिक युट्यूब चॅनेलवरील दि. १२ डिसेंबर २०२० रोजीची बातमी मिळाली. बातमीनुसार विट्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. ही निव्वळ अफवा आहे.

विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी ‘7 स्टार न्यूज’शी बोलताना सांगितले की, “व्हाट्सअप क्लीपमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. तसेच ही क्लिप पोलीस स्टेशनकडून रिलीज करण्यात आलेली नाही. विनाकारण नागरिकांमध्ये घबराट पसरावी किंवा गैरसमज निर्माण व्हावेत, या हेतूने ती क्लिप व्हायरल करण्यात आलीये. ही क्लिप अधिकृत नाही. शिवाय त्यातला मेसेज देखील पूर्णतः चुकीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची क्लिप पुढे पाठवू नये”

आमच्या पडताळणी दरम्यान आम्हाला जून २०१८ मधील ‘साम मराठी’ न्यूज चॅनेलचा एक रिपोर्ट देखील मिळाला. त्यावेळी देखील अशाच प्रकारचा मेसेज व्हायरल झाला होता. लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची किडनी, लिव्हर, हार्ट काढून मारून टाकणाऱ्या तीन हजार जणांची टोळी सक्रिय झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. त्यावेळी देखील अशी कोणतीही टोळी सक्रिय नसून ही केवळ अफवा आहे, असं त्यावेळी देखील पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीविषयीची (child kidnapping gang) जी ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय, ती फेक आहे. सांगलीतील विट्यात किंवा राज्यातील इतरही कुठल्या ठिकाणी लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झालेली नाही. पोलिसांकडून ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे ही वाचा- जुन्या टीव्ही-रेडीओमध्ये करोडोच्या भावात जाणारी ‘रेड मर्क्युरी? जाणून घ्या सत्य की अफवा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा