Press "Enter" to skip to content

कोरोनाचे औषध शोधल्याचा दावा करणाऱ्यावरच प्रयोग करण्याचा कायदा ‘कॅमरून’ देशात आहे का?

२३ जून २०२० रोजी बाबा रामदेवांनी कोरोनाचे औषध शोधल्याचा दावा करून त्याची जाहिरात केली आणि त्याच रात्री आयुष मंत्रालयाने औषधीच्या जाहिरात व विक्रीवर बंदी आणली. आज महाराष्ट्राने देखील बाबा रामदेवांच्या कोरोनावरील औषधीवर बंदी घातली.

या घडामोडींवर आजतागायत सोशल मिडीयामध्ये चर्चा चालूच आहेत. त्यातील काहींनी एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत रामदेव बाबांवर हा प्रयोग करायला हवा असं म्हणत आपलं मत व्यक्त केलंय.

Advertisement
https://www.facebook.com/photo.php?fbid=10158481698129281&set=a.10150347132264281&type=3&theater

‘पौल अतंगा एनजेआय’ असं नाव असलेल्या ट्विटर युजरच्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की ‘जे कुणी वैद्य कोव्हीड१९ बरा करू शकत असल्याचा दावा करत आहे त्यांना अटक करण्यात यावी विषाणूची लागण करवावी आणि मग जर ते बरे होण्यात यशस्वी झाले तर सरकार त्यांच्या दाव्याला दुजोरा देईल, मदत करेल.’

हेच ट्विट अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेअर केलंय.

मागे काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी असाच दावा केला होता तेव्हा सुद्धा हे ट्विट लोकांनी शेअर केलं होतं

https://www.facebook.com/photo.php?fbid=4535671299792468&set=a.175598515799790&type=3&theater

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास ही बाब आली आणि आम्ही पडताळणीस सुरुवात केली. सर्वात आधी ज्या व्यक्तीचे हे ट्विट सर्वजण शेअर करत आहेत तिचा ‘कॅमरून’ देशाशी नेमका काय संबंध आहे ते तपासून पाहिलं.

‘Paul Atanga Nji’ हे नाव गुगल सर्च केल्यावर असं लक्षात आलं की हे कॅमरून देशाचे मंत्री आहेत.

मग आम्ही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेलो. तिथे एकाच नावाचे दोन अकाऊंट सापडले. मग व्हायरल ट्विटच्या युजरनेमशी जुळणाऱ्या अकाऊंटवर क्लिक केले.

प्रोफाईल बघताच तसं सर्व गोष्टींचा उलगडा झाला. ‘Paul Atanga Nji’ या कॅमेरून देशाच्या मंत्र्याच्या नावे चालवलं जात असलेलं हे पॅरडी म्हणजेच नकली अकाऊंट असून त्यावरून केवळ हसवणूकीसाठी ट्विट केलं जातं.

Paul Atanga Nji cameroon minister parody twitter
Source: Twitter

ज्या ट्विटच्या आधारे लोक कॅमेरून देशातला नियम सांगत होते ते ट्विटर अकाऊंट खोटं निघालं पण मग आपल्या देशात या अशा दाव्यांविषयी काय नियम आहे हे पाहण्यासाठी आम्ही सहज सर्च केलं.

तिथे इंडियन एक्स्प्रेसची एक बातमी आम्हाला सापडली. ‘Tamil Nadu police arrest man who claimed to have found ‘herbal’ cure for Covid-19’ या बातमीचा सारांश असा की कोरोनावर आयुर्वेदिक औषध सापडलं असा दावा करत एका स्वयंघोषित डॉक्टरने वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची जाहिरात केली. हे जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा  director of Indian Medicine and Homeopathy यांनी तामिळनाडू पोलिसांकडे या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीवर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झालंय की कॅमरून देशातला कायदा सांगणारं ट्विट खोट्या अकाऊंटवरून आलेलं आहे. त्यावर विश्वास न ठेवलेलाच बरा.

भारतात कोरोनाचे औषध शोधल्याचा दावा करत जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सोय आहे, तसा कायदा आहे. परंतु त्या व्यक्तीस पकडून त्यावरच औषधीचा प्रयोग करण्याचा कायदा कुठल्याही देशात असल्याचं आम्हाला आढळलं नाही.

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा