Press "Enter" to skip to content

दिव्यांच्या रोषणाईने सजवलेली ती ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर धावणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ असल्याचे दावे फेक!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये दिव्यांची रोषणाई केलेली एक धावती ट्रेन बघायला मिळतेय. दावा केला जातोय की ही ट्रेन मुंबई-गोवा या मार्गावर धावणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ (Tejas Express) असून नाताळनिमित्त ही दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर आणि व्हॉट्सऍपवरही हा व्हिडीओ याच दाव्यांसह जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजय सावंत आणि मिलिंद यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता SWNS या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून 2 डिसेंबर 2021 रोजी म्हणजेच साधारणतः महिनाभरापूर्वीच हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.

व्हिडिओच्या कॅप्शननुसार व्हिडिओत दिसणारी ट्रेन ही 2021 सालची ‘ट्रेन ऑफ लाईट्स’ (Train Of Lights 2021) आहे. स्कॉट विल्यम्स या व्यावसायिक फोटोग्राफरने इंग्लंडमधील गुडरिंग्टन मार्गावर धावत असताना हा व्हिडीओ शूट केला आहे.

हाच व्हिडीओ 24 नोव्हेंबर रोजी स्कॉट विल्यम्स यांच्या फेसबुक पेजवरून देखील शेअर करण्यात आल्याचे बघायला मिळाले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “आज संध्याकाळी ‘ट्रेन ऑफ लाईट्स’ गुडरिंग्टन-पैगंटन मार्गावर धावत होती. समुद्रकिनाऱ्याजवळून जाताना सर्व काही उजळलेले बघणे हे खरंच जादुई दृश्य आहे. ख्रिसमस जवळ येत असताना ट्रेनचे काही फोटोज मिळण्याची आशा आहे”

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलवर शोध घेतला असता डेवोनलाईव्हच्या वेबसाईटवर ‘ट्रेन ऑफ लाईट्स’ संदर्भातील बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार ‘ट्रेन ऑफ लाइट्स’ ही डार्टमाउथ स्टीम रेल्वे आणि रिव्हर बोर्ड कंपनीद्वारे दक्षिण-पश्चिम इंग्लंडमध्ये दरवर्षी ख्रिसमसच्या वेळी चालविण्यात येणारी विशेष ट्रेन आहे. यावर्षी ही ट्रेन 24 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत चालवली गेली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये दिव्यांच्या रोषणाईने झगमगत असलेली ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस नाही. व्हायरल व्हिडिओतील ट्रेन इंग्लडमध्ये दरवर्षी खिसमसच्या निमित्ताने चालविली जाणारी ‘ट्रेन ऑफ लाइट्स’ ही विशेष ट्रेन आहे. या ट्रेनचा भारतीय तेजस एक्स्प्रेसशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- आयकर विभागाच्या छाप्यात घबाड सापडलेल्या पियुष जैनचे भाजपशी संबंध उघडकीस? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा