रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत सहावे स्थान मिळवले. या आनंदात जिओ भाग्यवान ग्राहकांना फ्री रिचार्ज (jio free recharge) करून देत असल्याचे मेसेज व्हायरल होतायेत.
‘Jio ऑफर 2020 में मुकेश अंबानी दुनिया के 6th सबसे धनि व्यक्ति बनने की ख़ुशी में नीता अंबानी ने 99 हजार Jio यूजर को 349 का 3 महीने वाला रिचार्ज फ्री (jio free recharge) में देने का वादा किया है तो अभी निचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे।👉 https://jio-rechrges.com/
कृपया ध्यान दे: 🙏🏻 ये ऑफर कभी भी ख़तम हो सकती है।’
असे मेसेज सोशल मीडियातून फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी ‘9172011480’ या आमच्या अधिकृत नंबरवर मेसेज निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहचल्याची बातमी १४ जुलै २०२०ची होती. याचाच अर्थ हे व्हायरल मेसेजचे प्रकरण ताजेच आहे.
१. व्हायरल मेसेज आम्ही व्यवस्थित वाचला. यामध्ये दिलेली लिंक ‘jio-rechrges.com‘ हीच मुळात संशयास्पद आहे. कारण यातील Recharges चे स्पेलिंग चुकीचे आहे.
२. दुसरी बाब म्हणजे जिओची अधिकृत वेबसाईट www.jio.com अशी आहे.
३. व्हायरल मेसेज मधील लिंकवर क्लिक केले असता जी वेबसाईट ओपन झाली तिचे होम पेज हे असे होते.
पेजचा कलर, बॅकग्राउंड ईमेजची क्वालिटी आणि फॉन्टला दिलेले इफेक्ट्स वेबसाईट बनावट असल्याचे दर्शवत आहेत.
४. वेबसाईट ईमेजमध्ये वापरलेला मुकेश अंबानी यांचा फोटो सुद्धा नेटका कट केलेला नाही. त्या फोटोच्या बॉर्डर्स कुरतडल्या सारख्या दिसताहेत. साहजिकच रिलायन्स जिओ अशा डिझायनरला रुजू करून घेणार नाही ज्याचे काम अगदी बेसिक आहे.
५. या विषयी सर्च केल्यानंतर चेतन शर्मा नावाच्या ट्विटर युजरचे ट्विट आम्हाला सापडले. त्यात त्यांनी या लिंकवर क्लिक करून त्यांच्या सूचना फॉलो केल्या होत्या. शेवटी रिचार्ज काही आला नाही. उलट त्यांचे पर्सनल डीटेल्स वेबसाईटकडे गेल्याचे दिसले.
मोबाईल नंबर्स, नावे आणि ईतर डेटा गोळा करून तो टेलीमार्केटिंग कंपनीजला विकण्याचा अनेकांचा उद्योग आहे. त्यापैकीच हे एक असावे असा अंदाज आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेजसोबत जोडलेली लिंक बनावट वेबसाईटची असल्याचे निष्पन्न झाले. जिओ किंवा रिलायन्सच्या वेबसाईटवर या अशा ऑफर विषयी कुठेही काही लिहिलेले आढळले नाही.
मुकेश अंबानी यांचे जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकाला नाव येण्याच्या बातमीचा कुणीतरी आपमतलबासाठी फायदा करून घेत आहे. अशा फसव्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका.
हेही वाचा: होंडा कंपनी फ्रीमध्ये ऍक्टिवा वाटतेय असा मेसेज तुम्हाला आलाय? मग हे नक्की वाचा
[…] हेही वाचा: मुकेश अंबानी जगातील सहाव्या क्रमांका… […]
[…] हे ही वाचा: मुकेश अंबानी जगातील सहाव्या क्रमांका… […]